टोळी अत्याचार प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवावा- चर्मकार समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 02:40 PM2020-11-11T14:40:15+5:302020-11-11T14:41:23+5:30

मुलीचे अपहरण करून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केले आणि तिला विष पाजून ठार केल्याप्रकरणी न्याय देण्यास जलद गती न्यायालयात खटला चालविण्यात यावा

The case of gang atrocities should be taken to court as soon as possible - the demand of the Charmakar community | टोळी अत्याचार प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवावा- चर्मकार समाजाची मागणी

टोळी अत्याचार प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवावा- चर्मकार समाजाची मागणी

Next
ठळक मुद्देनराधमांना फाशी व्हावीचर्मकार समाजाचे निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : टोळी, ता.पारोळा येथील दलित मुलीचे अपहरण करून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केले आणि तिला विष पाजून ठार केल्याप्रकरणी न्याय देण्यास जलद गती न्यायालयात खटला चालविण्यात यावा व दोषी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील चर्मकार समाज बांधवांतर्फे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार आणि पोलिसांना देण्यात आले आहे.
तहसीलदार श्वेता संचेती व पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोळुंखे यांना निवेदन देताना चर्मकार समाज तालुका अध्यक्ष धनंजय एदलाबादकर, प्रमोद रोझतकर, भूपेंद्र सावकारे, लताबाई सावकारे, दीपक घुले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.



 

Web Title: The case of gang atrocities should be taken to court as soon as possible - the demand of the Charmakar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.