बोदवडच्या उपनगराध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: June 17, 2017 12:56 PM2017-06-17T12:56:37+5:302017-06-17T12:56:37+5:30

या प्रकाराने राजकीय वतरुळात मोठी खळबळ उडाली आह़े

A case has been registered against the sub-inspector of Boudwad | बोदवडच्या उपनगराध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल

बोदवडच्या उपनगराध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

ऑनलाईन लोकमत

बोदवड, जि. जळगाव, दि. 17 -  नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष यांनी वीज कंपनीच्या कर्मचा:यास दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन उपनगराध्यक्षांसह तिघांना अटक करण्यात आली आह़े या प्रकाराने राजकीय वतरुळात मोठी खळबळ उडाली आह़े
15 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला व साईनगर भागातील वीजपुरवठा  खंडित झाल्याचे कळवले होत़े रात्रपाळीवर सहाय्यक अभियंता नीलेश रामकृष्ण राणे यांनी रोहित्र क्रमांक विचारला असता मी कोण आहे? हे कार्यालयात येऊन दाखवतो असे सांगत   शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप नीलेश राणे यांनी करीत  16 रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़
या प्रकरणी उपनगराध्यक्ष नितीन रमेश चव्हाण, भुषण सुभाष भोई, अतुल सुरेश भोई यांच्याविरुद्ध  गुरनं.32/17 कलम 343, 323, 504, 34 प्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला़
 

Web Title: A case has been registered against the sub-inspector of Boudwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.