कृषी निविष्ठांबाबत गैरप्रकार आढळल्यास कारवाई, जळगावात अपर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:43 PM2018-05-12T12:43:03+5:302018-05-12T12:43:03+5:30
खरीप हंगामपूर्व कृषी निविष्ठा गुणनियंत्रण प्रशिक्षण
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १२ - खरीप हंगामात बोगस निविष्ठांची विक्री किंवा जादा दराने विक्री करीत असल्याचे आढल्यास कृषी, महसूल व पोलीस विभागामार्फत कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी खरीप हंगामपूर्व कृषी निविष्ठा गुणनियंत्रण प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी दिला.
नियोजन भवन येथे खरीप हंगामपूर्व कृषी निविष्ठा गुणनियंत्रण प्रशिक्षण कार्यक्रम झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, मोहिम अधिकारी पी.एस.महाजन, जिल्हा गुणवंत्ता नियंत्रण निरीक्षक अमित पाटील, कृषी अधिकारी डी. एम. शिंपी, सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. निखिल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुºहाडे आदी उपस्थित होते. त्यांनी बियाणे, खते व किटकनाशके कायद्याबाबत मार्गदर्शन केले. महिको चे विभागीय व्यवस्थापक सुभाष थेटे यांनी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
सर्व विक्रेते, कंपनी प्रतिनिधी, शासकीय अधिकाºयांनी समन्वयाने कामकाज करुन खरीप हंगामात कृषी निविष्ठांबाबत कोणताही अनुचित प्रकार, बोगस निविष्ठांची विक्री होणार नाही यांची दक्षता घ्यावी, असे आवाहनही गाडीलकर यांनी केले.
या प्रसंगी जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) पंचायत समिती, मंडळ कृषी अधिकारी, वजन मापे निरीक्षक, घाऊक व किरकोळ विक्रेते, बियाणे, खते, किटकनाशक कंपनीचे जिल्हास्तर प्रतिनिधी, बियाणे, खते किटकनाशक असोसिएशन राज्य उपाध्यक्ष कैलास मालू व प्रमोद पाटील सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी तर सूत्रसंचालन मोहिम अधिकारी पी. एस. महाजन यांनी केले.