अमळनेर दगडफेक प्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By संजय पाटील | Published: March 31, 2023 05:10 PM2023-03-31T17:10:29+5:302023-03-31T17:12:56+5:30
गणेश पाटील व चरणदास यांना दगड लागले. दगडफेकीत मोटारसायकली, पथदिवे फोडण्यात आले.
अमळनेर, जि. जळगाव : शहरात कसाली भाग व भोईवाड्यात दोन गटात किरकोळ कारणावरून दगडफेक करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली होती. यात १६ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री तीन तरुण मोटारसायकलवर जाताना मोठ्याने ओरडत होते. त्यावेळी काही जणांनी दगडफेक केली. त्यात गणेश पाटील व चरणदास यांना दगड लागले. दगडफेकीत मोटारसायकली, पथदिवे फोडण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय शिंदे, एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, उपनिरीक्षक विकास शिरोळे, उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, हेकॉ. किशोर पाटील, रामकृष्ण कुमावत, प्रमोद पाटील, मिलिंद भामरे, संदेश पाटील, शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे, नाजीमा पिंजारी, नम्रता जरे आदी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी जमावाला शांत केले. गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.