Jalgaon: चाळीसगाव गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, हल्लेखोरांनी वापरलेली गाडी सायगव्हाणजवळ आढळली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 11:36 AM2024-02-08T11:36:29+5:302024-02-08T11:36:53+5:30

Jalgaon News: भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र भगवान उर्फ बाळू मोरे (६०) यांच्यावर  झालेल्या गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case registered against seven persons in Chalisgaon firing case, car used by attackers found near Saigwan | Jalgaon: चाळीसगाव गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, हल्लेखोरांनी वापरलेली गाडी सायगव्हाणजवळ आढळली

Jalgaon: चाळीसगाव गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, हल्लेखोरांनी वापरलेली गाडी सायगव्हाणजवळ आढळली

- जिजाबराव वाघ 

चाळीसगाव (जि.जळगाव) :  भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र भगवान उर्फ बाळू मोरे (६०) यांच्यावर  झालेल्या गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी वापरलेली कार नागद परिसरातील सायगव्हाण गावाजवळ बुधवारी रात्री आढळून आली. महेंद्र मोरे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी गोळीबार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती.

गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (वय २१, रा. चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरुन उद्देश उर्फ गुड्डू शिंदे (रा. हिरापूर), सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा. हुडको काॕलनी, चाळीसगाव), सॕम चव्हाण (रा. हिरापूर), भूपेश सोनवणे (रा. चाळीसगाव), सुमित भोसले (रा. चाळीसगाव), संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Case registered against seven persons in Chalisgaon firing case, car used by attackers found near Saigwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.