वाळूमाफिया संभाषण प्रकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:28+5:302021-05-25T04:18:28+5:30
प्रांताधिकाऱ्यांची कारवाई : सेवा शिस्तीचा भंग केल्याचा ठपका मुक्ताईनगर जि. जळगाव : वाळू तस्करी करणाऱ्या वाळूमाफियांसोबत महसूल कर्मचाऱ्याच्या संभाषणाचा ...
प्रांताधिकाऱ्यांची कारवाई : सेवा शिस्तीचा भंग केल्याचा ठपका
मुक्ताईनगर जि. जळगाव : वाळू तस्करी करणाऱ्या वाळूमाफियांसोबत महसूल
कर्मचाऱ्याच्या संभाषणाचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या पार्श्वभूमीवर वडोदा येथील तलाठी जयेश जगदीश सुरवाडे यास निलंबित करण्यात आले आहे.
वाळूमाफियांसोबत तलाठ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरलबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली. शुक्रवारी प्रांताधिकारी यांनी मुक्ताईनगर येथे भेट देऊन याबाबत चौकशी केली. सायंकाळी उशिरा वडोदा तलाठी जयेश जगदीश सुरवाडे यास निलंबित केल्याचा मेल तहसील कार्यालयात धडकला. मात्र, शनिवार व रविवार सुटी असल्याने सोमवारी निलंबनाची अधिकृत माहिती समोर आली. सेवा शिस्तीचा भंग केल्याचा ठपका निलंबन आदेशात देण्यात आला आहे.
दुसरीकडे वाळूमाफियांची टोळी आणि महसूल कर्मचारी यांच्यात कथितरीत्या पार पडलेल्या बैठकीत हप्ता ठरवून दिल्यानंतरही ट्रॅक्टर पकडले गेले. यात उद्भवलेल्या वादातून कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.