वाळू चोरीच्या गुन्ह्यात जळगावातील दोघांना एक वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:38 PM2018-02-14T22:38:27+5:302018-02-14T22:40:42+5:30
वाळूची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणात ट्रॅक्टर मालक संदीप पाटील (रा.कांचन नगर, जळगाव) व चालक चेतन सोनवणे (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या दोघांना न्यायालयाने बुधवारी एक वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि १४, : वाळूची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणात ट्रॅक्टर मालक संदीप पाटील (रा.कांचन नगर, जळगाव) व चालक चेतन सोनवणे (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या दोघांना न्यायालयाने बुधवारी एक वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.
११ आॅगस्ट २०१३ रोजी शनी पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी उमाकांत वाणी, कल्याण नाना कासार हे दोन्ही जण पेट्रोलिंगला असताना संदीप पाटील याच्या मालकीच्या ट्रॅक्टरमध्ये चेतन सोनवणे हा अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला होता. याप्रकरणी उमाकांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्या. निलिमा पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यात उपनिरीक्षक गजेंद्र लोहार, कर्मचारी उमाकांत चौधरी आणि कल्याण कासार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. पंच साक्षीदार बंडू परदेशी तसेच दगडू सपकाळे हे फितुर झाले. समोर आलेल्या पुराव्यावरुन न्यायालयाने टॅक्ट्रर मालक तसेच चालक अशा दोघांना चोरटी वाळूची वाहतुक प्रकरणी दोषी ठरविले. दोन्ही आरोपींना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा तसेच ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न भरल्यास तीन दिवसांची साधी कैदेची तरतुद केली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.