तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 09:33 PM2020-04-09T21:33:31+5:302020-04-09T21:34:12+5:30

अवैधरित्या वाळू वाहतूक पकडले होते ट्रॅक्टर

A case was registered against a tractor driver from the tehsil office | तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next

जळगाव : तहसील कार्यालयातून पळवून नेलेले वाळूचे ट्रॅक्टर मोहाडी येथे एका राजकीय पुढाऱ्याच्या घरासमोर उभे असल्याचे आढळून आले आहे. ट्रॅक्टर मालकानेच हे ट्रॅक्टर पळवून नेल्याचे समोर आले आहे.
अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर दंड वसुलीसाठी तहसील कार्यालयात उभे केलेले होते. ट्रॅक्टर मालकाने हे ट्रॅक्टर परस्पर पळवून नेल्याची घटना बुधवारी समोर आली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरविषयी तहसीलदार वैशाली हिंगे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह ४ एप्रिल रोजी मोहाडी येथे जाऊन हे ट्रॅक्टर जप्त केले होते. चालक रुपचंद गुलचंद साळुंखे (३३, रा. मोहाडी) याच्या ताब्यातील हे ट्रॅक्टर (क्र. एम.एच-१९ सी ३२७७) हे दंडवसुलीच्या कारवाईसाठी तहसील कार्यालयात उभे केले होते. चौकशीत सतीष संजय उर्फ ईश्वर कोळी (सोनवणे) रा. मोहाडी हे ट्रॅक्टरचे मालक असल्याचे समोर आले होते.
७ एप्रिलपर्यंत हे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे होते. ८ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तहसीलदार वैशाली हिंगे या कार्यालयात आल्या असता ट्रॅक्टर जागेवर दिसले नाही. तसेच गेटचे कुलूपही उघडे दिसले. त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारपूस तसेच चौकशी केली. तसेच इतरत्र शोध घेतला असता वाळूसहीत ट्रॅक्टर मालक सतीष कोळी यांनी परस्पर पळवून नेल्याचे समजले होते.
ट्रॅक्टर पळवून नेल्याची खात्री झाल्यानंतर तहसीलदार हिंगे यांच्या आदेशानुसार पिंप्राळा येथील मंडळाधिकारी रवींद्र उगले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर व ३ हजार ४९२ रुपयांची १ ब्रॉस वाळू असा एकूण २ लाख ५३ हजार ४९२ रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी शहर पोलिसात ट्रॅक्टर सतीष कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दंड न भरता कार्यालयाचे कुलूप तोडून वाळूने भरलेले ट्रॅक्टर मालक सतीष कोळी यांनी पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हे पळवून नेलेले ट्रॅक्टर मोहाडी येथील एका बड्या राजकीय पुढाºयाच्या दारासमोर उभे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाळू व्यवसायात राजकीय भागीदारी तर नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: A case was registered against a tractor driver from the tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव