विद्यार्थ्याच्या बॅगेतून रोकड व मोबाइल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:16 AM2021-04-10T04:16:15+5:302021-04-10T04:16:15+5:30

जळगाव : मू.जे. महाविद्यालयात एनसीसी परेडच्या चाचणीसाठी आलेल्या विशाल सुरेश तायडे (रा.रामेश्वर कॉलनी) या विद्यार्थ्याच्या बॅगेतून पाच हजार रुपये ...

Cash and mobile lamp from student's bag | विद्यार्थ्याच्या बॅगेतून रोकड व मोबाइल लंपास

विद्यार्थ्याच्या बॅगेतून रोकड व मोबाइल लंपास

Next

जळगाव : मू.जे. महाविद्यालयात एनसीसी परेडच्या चाचणीसाठी आलेल्या विशाल सुरेश तायडे (रा.रामेश्वर कॉलनी) या विद्यार्थ्याच्या बॅगेतून पाच हजार रुपये व मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्‍यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

रामेश्वर कॉलनीत विशाल तायडे हा विद्यार्थी मू.जे. महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता विशाल हा एनसीसी परेडच्या चाचणीसाठी महाविद्यालयात आला होता. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्याने सुध्दा पार्किंगमध्‍ये बॅग ठेवली होती. दहा वाजेच्या सुमारास चाचणी संपल्यानंतर तो बॅगेजवळ आला असता, त्यास बॅगेमध्‍ये ठेवलेले पाच हजार रुपये व मोबाइल चोरीला गेल्याचे दिसून आले. अखेर सायंकाळी त्याने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठत तक्रारी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Web Title: Cash and mobile lamp from student's bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.