दुग्धालयाचे कुलूप तोडून रोकड लांबवली, अर्धे शटर उघडून चोरी
By विजय.सैतवाल | Published: July 1, 2024 12:32 AM2024-07-01T00:32:41+5:302024-07-01T00:33:14+5:30
जिल्हा पेठ परिसरातील कांताई सभागृहासमोर असलेले दत्त दुग्धालय हे दुकान रात्री बंद करून दुकानमालक अमित चौधरी हे घरी निघून गेले. पहाटे चार ते सव्वा चार वाजेच्या सुमारास चोरट्याने एका शटरचे कुलूप तोडून अर्धे शटर उघडून आत प्रवेश केला अन्...
जळगाव : जिल्हापेठ परिसरात असलेल्या दत्त दुग्धालय या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातून आठ हजार रुपयांची रोकड लांबविली. ही घटना रविवारी (३० जून) पहाटे चार ते सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली. सकाळी दुकान उघडायला आले त्या वेळी ही चोरी लक्षात आली.
जिल्हा पेठ परिसरातील कांताई सभागृहासमोर असलेले दत्त दुग्धालय हे दुकान रात्री बंद करून दुकानमालक अमित चौधरी हे घरी निघून गेले. पहाटे चार ते सव्वा चार वाजेच्या सुमारास चोरट्याने एका शटरचे कुलूप तोडून अर्धे शटर उघडून आत प्रवेश केला. गल्ल्यात असलेल्या काही नोटा व चिल्लर अशी एकूण जवळपास आठ हजार रुपयांची रोकड चोरट्याने चोरून नेल्याची माहिती अमित चौधरी यांनी दिली.
सकाळी चौधरी यांच्या आई दुकान उघडण्यासाठी आल्या त्या वेळी कुलूप तुटलेले व शटर अर्धे उघडे दिसले. त्या वेळी त्यांनी घरातील सदस्यांना माहिती दिली. त्यांनी हे शटर न उघडता तसेच राहू दिले. त्यानंतर त्यांनी जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. दोन कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटा कैद झाला आहे. त्याने फ्रीजमध्ये लस्सी, रबडीदेखील पाहिली. मात्र कोणताही खाद्य पदार्थ न खाता व न चोरता त्याने गल्ल्यातून रोकड लांबविल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.