आता़़स्वस्त धान्यही मिळणार कॅशलेस

By admin | Published: January 4, 2017 01:09 AM2017-01-04T01:09:29+5:302017-01-04T01:09:29+5:30

नंदुरबार : कॅशलेस व्यवहारांना अधिक चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांत पीओएस मशिन बसवण्याचा निर्णय घेतला आहे़

Cashier still will get the grains | आता़़स्वस्त धान्यही मिळणार कॅशलेस

आता़़स्वस्त धान्यही मिळणार कॅशलेस

Next

नंदुरबार : कॅशलेस व्यवहारांना अधिक चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांत पीओएस मशिन बसवण्याचा निर्णय घेतला आहे़ याअंतर्गत आठवडाभरात प्रायोगिक तत्त्वावर दोन दुकानांमध्ये हे मशिन बसवण्यात येणार असून त्याद्वारे कॅशलेस धान्य देण्याची सोय करण्यात येणार आहे़
पुरवठा विभागाकडून कॅशलेस पद्धतीने धान्य देण्यासाठी आधार लिकिंंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे़ यामुळे येत्या काळात बायोमेट्रिक मशिनमध्ये केवळ अंगठा देऊन धान्न्याची उचल लाभार्थींना करता येणार असल्याचे पुरवठा विभागाने कळवले आहे़ उचल करणाºया लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून ती रक्कम पुरवठा विभागाला मिळणार असल्याने लाभार्थींची पैसे देण्यापासून सुटका होणार आहे़ जिल्ह्यात लवकरच बायोमेट्रिक मशिन्स प्राप्त होणार असल्याची माहिती आहे़

सहा लाख लाभार्थींची आधार जोडणी 
४अंत्योदय योजनेंतर्गत येणाºया जिल्ह्यातील लाभार्थींना वेळेवर आणि कॅशलेस धान्य मिळावे यासाठी बायोमेट्रिकच्या पहिल्या टप्प्यात सहा लाख ६५ हजार ४३२ लाभार्थींची आधार नोंदणी करण्याच्या कामांना सुरूवात करण्यात आली होती़ यात सहा लाख २० हजार ७९४ लाभार्थींच्या जोडण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ या लाभार्थींना येत्या काळात केवळ अंगठा टेकवल्यानंतर धान्य घरी घेऊन जाणे शक्य होणार आहे़ आधार कार्ड रेकॉर्डवर त्यांचे अंगठ्याचे नमुने आणि बँकेची माहिती आहे़ यामुळे त्यांच्या खात्यातून हा पैसा वजा करण्यात येऊन तो पुरवठा विभागाला व तेथून स्वस्त धान्य दुकानदाराच्या खात्यात जाणार आहे़  
४जिल्ह्यात एकूण एक हजार ५५ स्वस्त धान्याची दुकाने डिजीटल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून या दुकानांमध्ये बायोमेट्रिक आणि पीओएस मशिन देण्यात येतील़ दुकानदारांना या सर्व प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी विविध पथक स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण देणार आहेत़

Web Title: Cashier still will get the grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.