कास्ट्राइबतर्फे ६१ कोरोनायोद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:13 AM2021-01-04T04:13:46+5:302021-01-04T04:13:46+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे जिल्ह्यातील ६१ कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे जिल्ह्यातील ६१ कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आरोग्य, प्रशासनानामध्ये कोरोनाकाळात अविरत सेवा देणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय सचिव आर. बी. रोझोदकर, सहसचिव विजय मेढे, विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, प्रदीप जोगी, उदय पाटील, सुनील सूर्यवंशी, अनिल सुरडकर, बी.डी. बोदडे उपस्थित होते. महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील सोनवणे यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले. आभार जिल्हा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.टी. सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमास आरोग्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पालवे, शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष संदीप केदारे, रविकिरण बिऱ्हाडे, जितेंद्र जावळे, प्रताप बोदडे, सुमित्र अहिरे, हर्षद शाह, रामकृष्ण अडकमोल, संजय ठाकूर, कैलास तायडे, योगेश नन्नवरे आदी उपस्थित होते.