वसुलीसाठी थकबाकीदाराच्या घरासमोर वाजंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2017 03:04 PM2017-03-26T15:04:41+5:302017-03-26T15:04:41+5:30
थकबाकीची रक्कम न भरणा:या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशा वाजवून वसुली करण्याचा फंडा तळोदा नगरपालिकेच्या कर्मचा:यांकडून अवलंबिला जात आहे.
Next
तळोदा नगरपालिकेची फंडा : 144 जणांना दिली नोटीस
तळोदा, दि.26 : वारंवार सुचना तसेच नोटीस देऊन देखील थकबाकीची रक्कम न भरणा:या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशा वाजवून वसुली करण्याचा फंडा तळोदा नगरपालिकेच्या कर्मचा:यांकडून अवलंबिला जात आहे. बदनामीच्या भीतीने का होईना पण थकबाकीदार रक्कमेचा भरणा करीत आहेत.
पालिका हद्दीतील नागरिकांकडे थकीत मालमत्ता कर वसुली मोहिम पालिकेकडून सुरू आहे. यंदा विविध करांपोटी एक कोटी 20 लाख रूपयांचे उद्दिष्ट आहे. त्यातील 50 लाख म्हणजे 45 ते 50 टक्के वसुली करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आह़े नागरिकांकडील 100 टक्के वसुली करण्याचे शासनाचे आदेश असल्याने पालिकेकडून वसुली करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आह़े यात नवीन फंडा म्हणजे ढोल-ताशा वाजवून शुक्रवारपासून वसुली केली जात आहे. यात थकबाकीदाराच्या घरासमोर उभे राहून हे पथक ढोल-ताशा वाजवित आहेत. पालिकेच्या या अनोख्या फंडय़ामुळे वसुलीसदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी साधारण अडीच ते तीन लाख रूपयांची वसुली झाली. कर वसुलीसाठी हे पथक शहरातील प्रत्येक गल्लीत ढोल ताशांची वाजंत्री वाजवत फिरत असल्यामुळे साहजिकच कुणाकडे लगA अथवा हळदीचा कार्यक्रम आहे असे जाणून घेण्यासाठी बाहेर येतात. तेव्हा पालिकेचे वसुली पथक वाजंत्री वाजवून घरपट्टी वसूल करीत असल्याचे समजते. तेव्हा नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसतो.
विविध मालमत्ता कर वसुलीच्या 144 जणांना नोटीस
विविध मालमत्ता कर वसुली प्रकरणी शहरातील 144 जणांना नगरपालिकेने वसुलीच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यातील 14 थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाईदेखील केली आहे. त्यातील चार जणांनी जप्ती उठवून पालिकेची थकीत रक्कम भरल्याचे पालिकेत भरली आहे. थकीत वसुलीसाठी नगरपालिकेने थकबाकीदारांना वारंवार नोटीसा, सूचना देवूनही काही नागरिक वेळेवर घरपट्टी भरत नसल्याचे चित्र होते. मात्र पालिकेने वसुलीसाठी नवा फंडा अवलंबविल्याने प्रतिष्ठेपायी वसुलीस चांगला प्रतिसाद मिळत आहे.