मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा जळगावातून शुभारंभ, जिल्ह्यातील 1250 रुग्णांना करणार मोतीबिंदूमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:07 PM2017-11-23T13:07:25+5:302017-11-23T13:07:53+5:30
मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र संकल्पना प्रत्यक्षात साकारणार - गिरीश महाजन
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23 - येत्या 18 महिन्यात राज्यातील 17 लाख मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र ही मोहिम पूर्ण करण्यात येणार असून मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र संकल्पना प्रत्यक्षात साकारणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
या मोहिमेचा शुभारंभ 23 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातून महाजन यांच्या उपस्थितीत झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार बाळासाहेब सानप, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, जळगावचे महापौर ललित कोल्हे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जि.प. अध्यक्षा उज्जवला पाटील आदी उपस्थित होते.
शेवटच्या रुग्णार्पयत सर्वाना तपासणार - डॉ. तात्याराव लहाने
या वेळी बोलताना लहाने म्हणाले की, येथे येणा:या प्रत्येक रुग्णास, अगदी शेवटी जो राहिला असेल त्यालाही तपासण्यात येईल, असे डॉ. लहाने म्हणाले. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 1200 ते 1250 रुग्णांचे मोतीबिंदू काढण्यात येतील, असेही ते म्हणाले.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 2 हजार रुग्णांची तपासणी एकाच दिवशी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील 5 वॉर्डात तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख स्वत: करणार आहे.
ज्या रुग्णांच्या डोळयात मोतीबिंदू आढळेल त्यांच्यावर 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपयर्ंत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करताना दोन्ही डोळयांनी अंध, एका डोळयाने अंध व मोतीबिंदू फुटल्यामुळे काचबिंदू झालेल्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे.