नेरी येथे गुरांनी भरलेले वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:17 PM2018-10-23T23:17:50+5:302018-10-23T23:20:00+5:30
नेरी एरंडोल रस्त्यावर तब्बल तेरा वाहनांमध्ये भरलेले जनावरे बाजारात विक्री करून कत्तलीसाठी आणले जात असतांना गोरक्षकाने पकडून दिल्यानंतर संबंधित व्यापारी व वाहनचालकांनी थेट तक्रारदारालाच दमदाटी करत धक्काबुक्की केली
नेरी ता.जामनेर : नेरी एरंडोल रस्त्यावर तब्बल तेरा वाहनांमध्ये भरलेले जनावरे बाजारात विक्री करून कत्तलीसाठी आणले जात असतांना गोरक्षकाने पकडून दिल्यानंतर संबंधित व्यापारी व वाहनचालकांनी थेट तक्रारदारालाच दमदाटी करत धक्काबुक्की केली आणि गुरांनी भरलेले वाहने पळवून नेली सदर घटनेची माहिती गोरक्षक गोपाल बुळे यांनी येथील पोलीस चौकीत येवून सांगितली.
मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास नेरीदिगर पासून एक किलोमीटर अंतरावर गुरे भरलेले वाहन आढळले. एकामागे एक अशी तब्बल तेरा वाहने याठिकाणी जमा झाले. या वाहनातून प्रत्येकी पाच ते सहा जनावरांनी (बैल,गाय, म्हैस) कोंबून भरलेली होती.
हवालदार देशमुख, अरविंद मोरे, सचिन चौधरी घटनास्थळी हजर झाले. दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्याची तयारी पोलिसांनी केली. गोरक्षक गोपाल बुळे यांनी हरकत घेत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या दरम्यान वाद होऊन काही काळ तणाव झाला.पोलिसात उशिरापर्यंत या घटनेची नोंद नव्हती.