चोपडय़ात गुरांचा बाजार तेजीत
By admin | Published: January 30, 2017 12:47 AM2017-01-30T00:47:08+5:302017-01-30T00:47:08+5:30
चलन मिळविण्याचा प्रय} : सर्वसामान्य शेतक:यांना बैलजोडी घेणे कठीण
चोपडा : नोटाबंदीमुळे अनेक व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला. काहींना ‘शटर डाऊन’ करावे लागले. मात्र याच्या उलट परिस्थिती गुरांच्या बाजारात दिसून आली. गुरांचा बाजार अतिशय तेजीत आहे. बैलजोडीची किंमत लाखाच्या आसपास गेलेली आहे. हातात दोन पैसे असावेत म्हणून काही शेतकरी गुरे विक्री करीत आहेत.
गेल्या काही वर्षापासून नांगरटी, शेतमालाची ने-आण आदी कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली आहेत. त्यातच गेल्या दोन-तीन वर्षात पावसाचे प्रमाण कमी असल्याने चा:याचीही समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे ‘सर्जा-राजा’ची जोडी बाळगणे बळीराजालाही अवघड झाले होते. अशा स्थितीत अगदी चांगल्या प्रकारची बैलजोडीही मातीमोल किमतीत शेतक:यांना विकावी लागली. मात्र गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण ब:यापैकी होते. त्यामुळे चा:याचीही फारशी चणचण नाही. त्यातच तालुक्यात उसाचे उत्पन्न ब:यापैकी घेतले जात असल्याने चा:याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे. त्यामुळे चा:याअभावी कोणी गुरे विकत नाहीत. केंद्र सरकारने 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे छोटे व्यवसाय कोलमडले. हातावर पोट असणा:यांवर उपासमारीची वेळ येऊ लागली. खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले. याचा गुरांच्या बाजारावरही परिणाम झाला होता. मात्र आता ती परिस्थिती बदलली आहे.
चलन मिळविण्याचा प्रय}
दरम्यान, जिल्हा बॅँकांमध्ये फारच कमी पैसे शेतक:यांना मिळतात. त्यामुळे काही शेतक:यांनी हातात पैसे मिळावे म्हणूनही गुरांची विक्री केल्याचे सांगण्यात आले.
लाखोंची उलाढाल
आज भरलेल्या या बाजारात अनेक गुरांची विक्री झाली. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बैलजोडी घेणे अवघड
बैलबाजारात बैल घेण्यासाठी आलो असता बैलांच्या किमती लाखात असल्याने बैलजोडी घेणे अवघड झाले आहे, तसेच बैल व्यापारी बैलांची किंमत रोखीने मागत असल्याने आर्थिक अडचण झाल्याचे घमा धनगर (चहार्डी) या शेतक:याने सांगितले.
रोख पैसे मिळविण्याचा प्रय}
या वर्षी उत्पन्न ब:यापैकी आले. मात्र कांद्याला भाव कमी असल्याने आर्थिक अडचणीत सापडलो, म्हणून बाजारात गुरे विक्रीस आणून हातात रोख पैसे मिळविण्याचा प्रय} केल्याचे अशोक बाविस्कर (लासूर) यांनी सांगितले. (वार्ताहर)
चोपडा येथे रविवारी बाजार समितीच्या यावल रोडलगत असलेल्या मोकळ्या जागेत सर्व प्रकारच्या गुरांचा बाजार भरत असतो. आजही या बाजारात अनेक शेतक:यांनी गुरे विक्रीला आणली होती.
4 गुरांच्या बाजारात बैलांच्या किमती अचानक वधारलेल्या आहेत. बैलजोडीची किंमत 80 हजार ते 1 लाखार्पयत होती. त्यामुळे सर्वसामान्य शेतक:यांना बैलजोडी घेणे आवाक्याबाहेरचे झाले आहे.