गुरांच्या चौकशीला आले अन् शेतकरी आरोपी झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:52 PM2020-07-26T12:52:24+5:302020-07-26T12:53:05+5:30
जळगाव : चारचाकी वाहनातून गुरांची कोंबून वाहतूक होत असताना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराजवळ वाहन चालकावर कारवाई ...
जळगाव : चारचाकी वाहनातून गुरांची कोंबून वाहतूक होत असताना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराजवळ वाहन चालकावर कारवाई केली. चौकशीअंती त्या गुरांचे मालक शेतकरी निघाले. चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी त्यांनाच आरोपी केल्याचा प्रकार शनिवारी घडला. हिंमत किसन पाटील, हुसनोद्दीन शेख जहीरोद्दीन, सतीश उर्फ अतुल फकीरा थोरात व मोहम्मद शेख हनिफ (सर्व रा.शिरसोली, ता.जळगाव) अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी चारचाकी वाहनात (क्र.एम.एच.१९ ४६, ए.ई.५४४४) दहा जनावरे कोंबून भरले होते. चालक मोहम्मद बिलाल शेख जहांगीर (रा.नशिराबाद) व त्याच्यासोबत असलेला शेख वसीम शेख युनुस (रा.तांबापुरा, जळगाव) या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ परवाना व गुरांच्या पावत्या नव्हत्या.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता शिरसोली येथील शेतकऱ्यांनी ही जनावरे शनिवारच्या आठवडे बाजारात विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.
निर्दयीपणे वाहतूक केल्याने या प्रकरणात शेतकºयांनाही आरोपी करण्यात आले.े