सांडपाण्यावर जगविले कपाशीचे पिक

By admin | Published: July 16, 2017 12:17 PM2017-07-16T12:17:36+5:302017-07-16T12:17:36+5:30

विशेष म्हणजे हे पिक आज उत्तम स्थितीत आहे.

Caulage pickle on sewage | सांडपाण्यावर जगविले कपाशीचे पिक

सांडपाण्यावर जगविले कपाशीचे पिक

Next
लाईन लोकमत / रामचंद्र पाटीलर}ापिंप्री, जि. जळगाव, दि. 16 - : राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी लावत असला तरी सडावण परिसरात अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीपातील पिकांची स्थिती अतिशय नाजूक झालेली आहे. जूनमध्ये केलेल्या पेरण्या वाया गेल्याने, दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अशा गंभीर परिस्थितीत सडावण (ता.अमळनेर) येथील दोन शेतक:यांनी गटारीतील सांडपाण्याचा वापर करून खरीपातील कपाशीचे पिक जगविण्याचा प्रय} केला आहे. विशेष म्हणजे हे पिक आज उत्तम स्थितीत आहे.सडावण येथील अरूण हिंमत पाटील यांच्याकडे सात बिघे शेती आहे. यापैकी दोन बिघे शेत घराजवळ तर पाच बिघे शेत थोडय़ा अंतरावर आहे. त्यांनी जून महिन्यात शेतात कपाशीची लागवड केली होती. घराजवळील विहिरीत असलेले पाणी त्यांनी कपाशीला दिले. मात्र विहिरीतील पाणीही आटू लागले. त्यामुळे पिके जगविण्याची चिंता होती. यादुष्काळी परिस्थितीवर मात्र त्यांनी यशस्वीरित्या मात केली. त्यांचे घर गावाच्या शेवटच्या टोकाला आहे. गावातील दोन तीन गटारींचे सांडपाणी त्यांच्या घराजवळूनच वाहत जाते. या सांडपाण्याचा उपयोग करण्याचे त्यांनी ठरविले. त्यांनी वाया जाणारे सांडपाणी अडवून ते मोटारीच्या साह्याने घराजवळील शेतातील विहिरीत टाकले. विहिरीत पडलेले पाणी दोन बिघे कपाशीला दिले जात आहे. गेल्या महिन्याभरापासून हा प्रयोग सुरू आहे. या सांडपाण्याचा फायदा असा झाला की त्यांना खताचा वापर करावा लागला नाही. विहरीपासून दुस:या शेतर्पयत त्यांनी पाईप लाईन पूर्वीच टाकून ठेवलेली आहे. त्यामुळे दुस:या शेतातील कपाशीलाही हेच सांडपाणी दिले जाते. या सांडपाण्यामुळे कपाशी पिकाची स्थिती आजच्या स्थितीत उत्तम आहे.असाच प्रयोग सडावणमधील योगेश केशव पाटील या तरूण शेतक:यानेही केला आहे. त्यांनी सडावण, पैलाड, चाकवे, नेरपाट या गावातून वाहन येणारे सांडपाणी गोपीनाल्यात अडवून ते पाणी एक किलोमीटर अंतरावरील शेतातील विहिरीत टाकून, तेच पाणी कपाशीला दिले जात आहे. त्यांचाही प्रयोग यशस्वी झाला आहे.पावसाने दडी मारल्याने, पिके जगविणे कठीण झाले होते. त्यामुळे आपण सांडपाण्याचा वापर करून, कपाशी पिकाला पाणी दिले. आज या पिकाची स्थिती उत्तम आहे, असे शेतकरी अरूण पाटील यांनी सांगितले.

Web Title: Caulage pickle on sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.