कजर्माफी योजनेला भारनियमनाचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:42 PM2017-09-15T12:42:53+5:302017-09-15T12:43:16+5:30
प्रक्रियेत खोडा : अर्ज दाखल करण्यास मिळाली मुदतवाढ, अडथळे दूर होण्याची अपेक्षा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी कर्ज माफी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत वाढ मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. 14 सप्टेंबर्पयत कुटुंब व्याख्येनुसार जळगाव जिल्ह्यात दोन लाख 43 हजार (वैयक्तिक चार लाखाच्यावर) शेतक:यांचे अर्ज दाखल झाले आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी भारनियमनामुळे अडचणी येत असल्याने दररोजची सरासरी 10 ते 20 टक्क्यांवर आली आहे.
या योजनेचे अर्ज नोंदणीस 24 जुलै पासून सुरुवात झाली. यामध्ये 14 सप्टेंबर्पयत कुटुंब व्याख्येनुसार जळगाव जिल्ह्यात दोन लाख 43 हजार शेतक:यांचे अर्ज भरल्या गेले आहेत.
15 सप्टेंबर अखेरचा दिवस असल्याने त्यासाठी लगबगदेखील सुरू होती. मात्र यासाठी मुदतवाढीची घोषणा रात्री झाल्याने दिलासा मिळाला आहे.
या योजनेच्या अंमबलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली 13 रोजी जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीदेखील स्थापन करण्यात आली असून सोबतच तालुकास्तरावर उपविभागीय अधिका:यांच्या अध्यक्षतेखाली समित्या लवकरच स्थापन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व कजर्दार शेतकरी सभासदांनी तसेच विकास संस्था व सर्व बँकांनी अर्ज भरावेत असे आवाहन, जिल्हा उपनिबंधक विजय जाधवर यांनी केले आहे.
भारनियमनाचा खोडा
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात महा ऑनलाईन, सी.एस.सी. एस.पी.व्ही., आपले सरकार वेब पोर्टलची अशा केंद्रांद्वारे अर्ज भरले जाऊ लागले. यात सव्र्हर हँग होणे, वेबसाईट ओपन न होणे आदी अडचणी येत होत्या. यासाठी जळगाव जिल्ह्यात ऑफलाईन अर्ज जमा करून ते रात्री किंवा इतर वेळी वेबसाईट सुरळीत सुरू असताना ऑनलाईन भरण्याचा धडाका सुरू झाला. मात्र यात आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भारनियमनामुळे खोडा येत आहे.
संख्या आली 10 ते 20 टक्क्यांवर
दररोज 10 हजार अर्ज भरल्या जाऊ लागल्यानंतर आता भारनियमनाच्या अडथळ्य़ामुळे ही संख्या एकदम एक ते दोन हजारांवर आली आहे. त्यामुळे शेतक:यांचे अर्ज आले तरी ते अपलोड करण्यात अडचणी येत आहे.
मुदत वाढ मिळाली, भारनियमनाचे काय?
भारनियमनामुळे अर्ज अपलोड करण्यात अडचणी येत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, याबाबत राज्यभरातील जिल्हा उपनिबंधकांसह जळगावचे जिल्हा उप निबंधक विशाल जाधवर यांनीही वरिष्ठांना कळविले होते. आता मुदतवाढ तर मिळाली आहे, मात्र भारनियमनाचा अडथळाही दूर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सव्र्हर डाऊन, तांत्रिक अडचणीसोबतच आता भारनियमनामुळे कजर्माफीचे अर्ज अपलोड करण्यास अडचणी येत आहे. दोन ते तीन दिवसांपासून भारनियमनामुळे ही संख्या एकदमच कमी झाली आहे. मुदतवाढी विषयी वरिष्ठांकडे कळविले होते.
-विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक