पाणी टंचाईमुळे सीताफळ हंगाम महिना अगोदर संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 04:49 PM2018-12-07T16:49:08+5:302018-12-07T16:52:13+5:30
यंदा पाणी टंचाईमुळे हिवाळ्यातच विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याअभावी सीताफळांच्या बागा सुकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सोयगाव : यंदा पाणी टंचाईमुळे हिवाळ्यातच विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याअभावी सीताफळांच्या बागा सुकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सीताफळाचे आगर म्हणून तालुक्याची ओळख आहे. याठिकाणी प्रमाणावर सिताफळाचे उत्पादन होत असल्याने परराज्यात ही येथील गोड सीताफळे लोकप्रिय आहे. यंदाही सिताफळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. चांगले भावदेखील मिळाले. मात्र हवामान बदलामुळे या सिताफळा वर मिलीबग रोगाची लागण झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महागडी औषधे वापरून मिलीबग थांबवला मात्र विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने नवे संकट उभे राहिले. सीताफळाच्या बागा वाचवण्यासाठी पाणीही मिळेना त्यामुळे या बागा सुकल्या.डिसेंबर अखेरपर्यंत चालणारा सीताफळाचा हंगाम लवकर थांबला. त्यामुळे सिताफळ उत्पादकाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे सिताफळाचे लिलाव घेणाºया अनेकांना याचा फटका बसला. या सीताफळ व्यवसायातील चांदीबाई पठाण यांनी सांगितले की लिलावाद्वारे आम्ही हे सीताफळाचे मळे विकत घेतले मात्र हंगाम लवकर संपल्यान मोठा आर्थिक संकट वाढले आहे.