भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयात सीबीसीएस कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:10 AM2018-08-11T00:10:51+5:302018-08-11T00:14:36+5:30
भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चॉईस बेस क्रेडीट सिस्टीम (सीबीसीएस) विद्यापीठस्तरीय कार्यशाळा नुकतीच झाली. यावेळी बहुसंख्य तज्ज्ञ व प्राध्यापक उपस्थित होते.
भुसावळ, जि. जळगाव : येथील नाहाटा महाविद्यालयात व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चॉईस बेस क्रेडीट सिस्टीम (सीबीसीएस) विद्यापीठस्तरीय कार्यशाळा नुकतीच झाली. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पी.पी. माहुलीकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता पी.पी.छाजेड, मानवविज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.प्राचार्य प्रमोद पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य कार्यक्रम अध्यक्ष एम.व्ही.वायकोळे, विद्या परिषद सदस्य डॉ.शुभांगी राठी, अधिसभा सदस्य प्रा.नितीन बारी, कार्यक्रम समन्वयक उपप्राचार्य एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.बी.एच. बºहाटे, ए.डी.गोस्वामी, प्रा.एन.ई. भंगाळे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, जे.एन.चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. डॉ.प्रमोद पवार यांनी मार्गदर्शन केले.
सीबीसीएस कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्र.कुलगुरू पी.पी.माहुलीकर यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने वर्ष २०१८-१९ पासून सीबीसीएस पॅटर्न प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी लागू केलेले आहे.
याबाबत प्राध्यापकांमध्ये बराच संभ्रम होता. संभ्रम दूर करण्यासाठीच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी कार्यशाळेचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे. कोणताही पॅटर्न स्वीकारत असताना अनेक अडचणी असतात. परंतु त्यावर मार्ग काढणे हे आपल्या शिक्षकांचे कर्तव्य आहे आणि आपण त्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत याची आम्हाला खात्री आहे.
कोणत्याही अडचणी आपणास आल्यास त्या विद्यापीठाशी संपर्क साधून सोडविल्या जातील अशी ग्वाही देण्यात आली.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक एम.व्ही.वायकोळे यांनी तर सूत्रसंचालन ए.डी.गोस्वामी यांनी केले आणि आभार प्रा.एन.ई.भंगाळे यांनी मानले.