जळगावात सीबीएसई बारावी परीक्षेच्या निकालात ‘क्षितिज’ चमकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:50 PM2018-05-27T12:50:59+5:302018-05-27T12:50:59+5:30
विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पाहिला निकाल
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल शनिवारी दुपारी साडेबारा वाजता संकेतस्थळावर जाहीर झाला़ यामध्ये शहरातील बारावीच्या सीबीएसईच्या पाच शाळांमध्ये रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी क्षितिज प्रसाद जगताप याने सर्वाधिक ९६़.२ टक्के गुण मिळवून आपली चमक दाखवली.
शनिवारी निकाल लागणार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती़ अखेर दुपारी साडेबारा वाजता संकेतस्थळावर आॅनलाइन निकाल जाहीर झाला़ त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक संकेतस्थळावर निकाल पाहत असताना संकेतस्थळ हँग झाले़ तब्बल एक तासापर्यंत निकाल पाहता आला नाही़ त्यानंतर ही संकेतस्थळ सुरळीत झाले अन् विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला़
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, उमवि केंद्रीय विद्यालय, सेंट जोसेफ, गोदावरी सीबीएसई स्कूल, ओरियन स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मार्च व एप्रिल महिन्यात परीक्षा दिली होती़ यामधील गोदावरी, सेंट जोसेफ व केंद्रीय महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे़ सेंट जोसेफच्या मिलोनी दीपक अटल या विद्यार्थिनीनेही ९५़.४ गुण प्राप्त करत विशेष यश संपादन केले आहे़
असा आहे शाळानिहाय निकाल
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमधील क्षितिज प्रसाद जगताप हा विद्यार्थी ९६़.२ टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. साक्षी रवींद्र राणे ९२़.८ टक्के गुण मिळवून द्वितीय तर दीक्षा सुनील चोरडिया हिने ९२़.२ टक्के गुण मिळवून शाळेतून तिसरा क्रमांक मिळविला.
सेंट जोसेफ स्कूलमधील मिलोनी दीपक अटल हिने ९५़ .४ टक्के गुण मिळवून प्रथम तर अजिंक्य संजय पाटील ९४ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला, तर वंशिका सुनील मंधान ८५़ .२ टक्के गुण मिळवून तिसरी ठरली आहे़
ओरियन स्कूलमधून पूजा संजय थोरात हिने ९०़.४० टक्के मिळवून प्रथम तर मानसी मनोज महाजन हिने ९०़२० टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक प्राप्त केला. नंदिनी विजय भन्साली ८४़.६० गुण मिळवून तिसरी ठरली़
केंद्रीय विद्यालयातून रोशन झाल्टे ८७ टक्के गुण मिळवित प्रथम तर अमेय रामटेके ७९ टक्के मिळवून द्वितीय व अपूर्वा दामले ७८ टक्के गुण मिळवून तिसरी ठरली आहे़
गोदावरी विद्यालयात अमेय जयंत लाठी हा ८९.४ टक्के मिळवून शाळेतून प्रथम तर ८५.४ टक्के मिळवत आदित्य पाटील द्वितीय, ७८.८ टक्के मिळवत सिद्धांत प्रशांत जाधव तृतीय क्रमाकाने उत्तीर्ण झाला.