केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी.मधील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:20+5:302021-04-18T04:15:20+5:30

जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे आजपर्यंत १३५ कोरोना पेशंट आज तज्ज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सेवेमुळे ...

In the CCC of Keshavsmriti Pratishthan | केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी.मधील

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी.मधील

googlenewsNext

जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे आजपर्यंत १३५ कोरोना पेशंट आज तज्ज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सेवेमुळे यशस्वी उपचार

घेऊन तंदुरुस्त होऊन स्वगृही परतले आहेत.

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात दि. ११ मार्च २०२१ पासून स्वतंत्र विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या ठिकाणी रुग्णांची घरासारखी पूर्णतः वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेण्यात येते, सोबतच योगासन, विविध प्रकारचे खेळ घेण्यात येतात. आरोग्यासोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी अनेक मोटिव्हेशनल स्पीकर्स, तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन रुग्णांसोबत संवाद साधत आहेत.

ऑक्सिजन बेडची व्यवस्था उपलब्ध

कोरोना रुग्णांची वाढती संख्या व रुग्णांच्या नातेवाइकांची ऑक्सिजन बेडसाठी होणारी धावपळ लक्षात घेऊन स्वतंत्र २० ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत. या ठिकाणी २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, प्रशिक्षित वाॅर्ड बॉय व नर्स उपलब्ध आहेत, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना शुल्कात विशेष सवलत असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, प्रकल्प प्रमुख सतीश मोरे यांनी दिली आहे.

Web Title: In the CCC of Keshavsmriti Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.