पारोळा येथे सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:39 PM2019-12-11T18:39:05+5:302019-12-11T18:40:11+5:30
सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.
पारोळा, जि.जळगाव : येथील ओम नमोशिवाय जिनिंग केंद्रावर भारत सरकारच्या भारतीय कापूस महासंघ अर्थात सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. गुजरात राज्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांना ५०० रुपये कापसाला बोनस द्यावा या मागणीसाठी आपण विधानभवनात विषय मांडून स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन आमदार चिमणराव पाटील यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी दिले.
अध्यक्षस्थानी पणन महासंघाचे संचालक संजय पवार तर अतिथी म्हणून बाजार समिती सभापती अमोल पाटील, जळगाव बाजार समिती संचालक लक्ष्मण पाटील, सहाय्यक निबंधक जी.एच.पाटील, व्यवस्थापक आर.जी.होले, सेना नगरसेवक मंगेश तांबे, शेतकी संघ अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भिकन महाजन व बाजार समिती संचालक चतुर पाटील, मधुकर पाटील, डॉ.पी.के.पाटील, प्रा.बी.एन.पाटील अर्जुन पाटील, सखाराम चौधरी, बाजार समिती सचिव रमेश चौधरी, पं.स. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अशोक पाटील, प्रमोद जाधव,पांडुरंग पाटील, प्रा.आर.बी.पाटील, दगडू पाटील, सुधाकर पाटील तसेच ओमनमोशिवाय जिनिंग संचालक दयाराम पाटील, संजय पाटील, भगववन मोरे, पांडुरंग मोरे, रवींद्र मराठे, चंद्रकांत वाणी, देवीदास वाणी उपस्थित होते.
यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. विजय गंभीरराव पाटील, चोरवड या शेतकºयाचा माल प्रथम मोजला गेला. कापसाची प्रतवारी, त्यात असलेला ओलावा(आर्द्रता) पाहून केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार कापसाला भाव दिला जाणार आहे. सद्य:स्थितीत प्रथम आवकच्या मालाला ५५०० प्रमाणे भाव दिला जात असला तरी मालात ओलावा जास्त राहिल्यास भाव कमी होईल, असे संकेत केंद्रप्रमुख व अधिकारी आर.जी होले यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात संजय पवार यांनी शेतकऱ्यांनी कापूस आणताना कोरडा आणावा म्हणजे भाव योग्य मिळेल. तसेच पेमेंट हे अवघ्या दोन दिवसात आॅनलाईन टाकले जाईल. आमदार पाटील यांनी कापूस पणन विभागाच्या अडचणी, शेतकी संघाचा कापूस खरेदीत नसलेला सहभाग व कापसाला ५०० रु. बोनस मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.