५० टक्के शेतकऱ्यांकडे माल शिल्लक असताना सीसीआयने थांबविली खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 12:13 PM2020-03-02T12:13:28+5:302020-03-02T12:13:39+5:30

महिनाभरात दुसऱ्यांदा थांबविली खरेदी : कापसाच्या विक्रीवर ‘कोरोना’ची संक्रात कायम

 CCI stopped buying while 5% farmers had goods left over | ५० टक्के शेतकऱ्यांकडे माल शिल्लक असताना सीसीआयने थांबविली खरेदी

५० टक्के शेतकऱ्यांकडे माल शिल्लक असताना सीसीआयने थांबविली खरेदी

googlenewsNext

जळगाव : शेतकºयांकडे एकीकडे ५० टक्के माल शिल्लक असताना सीसीआय ने शनिवारपासून खरेदी थांबविली आहे. महिनाभरातच सीसीआयने दुसºयांदा खरेदी थांबवली असल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खासगी खरेदी केंद्रावर शेतकºयांचा माालाला भाव मिळत नाही तर शासकीय खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खान्देशात कापसाची लागवड १० ते २० टक्क्यांनी अधिक झाली होती. डिसेंबरमध्ये खरेदी केंद्र सुरु झाल्यानंतर कापसात ओलावा असल्याने बहूतेक शेतकºयांनी आपला माल विक्रीसाठी बाजारात आणला नाही. त्यानंतर संक्रातीनंतर बाजारात तेजी येईल व भाव वाढतील ही आशा देखील फोल ठरल्याने शेतकºयांनी फेब्रुवारी मध्यापर्यंत कापूस विक्रीसाठी आणलाच नाही. मात्र, आता भाव वाढीची आशा मावळल्याने शेतकºयांकडून कापूस खरेदी केंद्रावर माल आणला जात असताना दुसरीकडे सीसीआयने खरेदी थांबविल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून, सीसीआयने पुन्हा केंद्र सुुरु न केल्यास कमी भावात शेतकºयांना आपला माल विक्री करावा लागणार आहे.
माल ठेवण्यास जागा नसल्याने खरेदी थांबवली
सीसीआयने देशभरात १ लाख गाठी खरेदी करण्याचे उदिष्ठ ठेवले आहे. आतापर्यंत ७० लाख गाठींची खरेदी सीसीआयने केली आहे. सीसीआयने १५ मार्चपर्यंत खरेदी थांबविल्याचे सांगितले जात आहे. सीसीआयच्या गोडावून मध्ये माल ठेवण्यासाठी जागा नसल्याने तात्पुरती खरेदी थांबविण्यात आली असल्याची माहिती प्रदीप जैन यांनी दिली. दरम्यान, सीसीआयच्या अध्यक्ष पी.अलीराणी यांनी एका कार्यक्रमात दिलेल्या यंदा सप्टेंबरपर्यंत खरेदी सुरु राहील अशी माहिंती दिली.
दरम्यान, सीसीआयने खरेदी थांबवली असली तरी पणन महासंघाकडून खरेदी सुरु आहे. तर खासगी खरेदी केंद्रावर खरेदी सुरु असली त्याठिकाणी भाव कमी मिळत आहे.
शेतकºयांचा मालाला आता कमी भाव भेटत असला तरी शासकीय खरेदी बंद झाल्याने खासगी केंद्रावर कापसाने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

देशभरातून ८० लाख तर खान्देशात १२ लाख गाठींची खरेदी
सीसीआय व खासगी जिनींग मिळून २९ फेब्रुवारीपर्यंत देशभरात एकूण ८० लाख गाठींची खरेदी झाली आहे. तर खान्देशात १२ लाख गाठींची खरेदी झाल्याची माहिती खान्देश जिनींग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी ‘लोकमत’ ला दिली. खान्देशात दरवर्षी १५ ते १६ लाख गाठींची खरेदी होत असते. मात्र, यंदा कापसाची लागवड जास्त असल्याने यंदा २० लाख गाठी खरेदी होण्याचा अंदाज आहे.

कोरोनामुळे कापूस बाजारावर संक्रात
-चीन मध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारताहून चीनला जाणारा माल पुर्णपणे थांबला आहे. आता भारतापाठोपाठ अमेरिकेनेही चीन मधील निर्यात थांबविली आहे. त्यामुळे आंतराराष्टÑीय बाजारावर परिणाम झाला आहे.
-कापसाचा जागतिक भाव ठरविणाºया न्युयॉर्क ट्रेडमध्ये सेंट चा भाव ७० वरून ६१ वर आला आहे.
-त्यामुळे खंडीच्या भावातही मोठी घट झाली आहे. आठवडाभरापुर्वी ३९ हजार भाव असलेल्या खंडीचे भाव ३७ हजारवर आले आहेत. सरकीच्या भावातही चारशे रुपयांची घट झाली आहे.

सीसीआयने खरेदी तात्पुरती थांबवली आहे. सीसीआयच्या गोडावूनमध्ये माल ठेवण्यास जागा उपलब्ध नाही. त्यामुळे काही दिवस खरेदी थांबविली असावी. मात्र, सीसीआयच्या अध्यक्षा पी.अलीराणी यांनी सप्टेंंबरपर्यंत खरेदी केंद्र सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने शेतकºयांनी घाबरण्याची गरज नाही.
-प्रदीप जैन, अध्यक्ष,
खान्देश जिनींग असोसिएशन

कोरोना व्हायरसचा कापूस बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. खंडी, सरकीच्या भावातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. भविष्यातही हीच स्थिती कायम राहिल्यास खासगी जिनर्सला माल जास्त भावात खरेदी करणे परवडणारे नाही. यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो.
-हर्षल नारखेडे, जिनर्स व कापूस बाजाराचे तज्ज्ञ

Web Title:  CCI stopped buying while 5% farmers had goods left over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.