‘सीसीटीव्ही’ला चिकटपट्टी लावून चोरटय़ांनी लांबविले शितपेय
By admin | Published: June 26, 2017 01:35 PM2017-06-26T13:35:55+5:302017-06-26T13:35:55+5:30
जळगावातील एका हॉटेलमधील घटना
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26 : शहरात चोरी व घरफोडीच्या घटना सुरुच असून शनिवारी मध्यरात्री दोन तरुण चोरटय़ांनी रिंगरोडवरील हॉटेल चाट लाऊंज बाहेरील फ्रीजचे कुलूप तोडून काही शितपेय रिचवून सहा हजाराची शितपेय लांबविली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला़ सीसीटीव्ही कॅमे:यात कैद होऊ नये म्हणून चोरटय़ांनी दोन कॅमे:यांना चिकटपट्टी लावली तर एका कॅमे:यास चिकटपट्टी लावता आली नाही. शितपेय उडविणे, गुळण्या करणे, हात धुणे अशी चोरटय़ांची मस्ती एका सीसीटीव्हीत कैद झाली आह़े
गणेश कॉलनी येथील रहिवासी महेश अविनाश सोनी यांची रिंगरोडवर आंध्रा बँकेसमोर हॉटेल आह़े शनिवारी रात्री 11़30 वाजता हॉटेल बंद केली़ सकाळी सात वाजता हॉटेल उघडण्यासाठी कामगार गोकूळ पाटील हे आल़े त्यांना हॉटेल बाहेर असलेल्या फ्रीजचे कुलूप तुटलेले दिसल़े पाहणी केली असता फरशा अस्वच्छ तर फ्रिजमधील शितपेय गायब झालेली दिसली़ परिसरात पाहणी केली असता हॉटेलमधील अर्धा लीटर व 300 मिलीच्या बाटल्या रिकाम्या पडलेल्या दिसल्या़ पाटील यांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी मालक सोनी यांना फोन केला़ काही वेळातच सोनी हॉटेलवर पोहचले असता प्रकार उघड झाला़