टॅंकवर सीसीटीव्हिची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:17 AM2021-05-08T04:17:00+5:302021-05-08T04:17:00+5:30
मराठा आरक्षणाचा लढा सुरूच राहणार जळगाव : मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोरोनासारख्या ...
मराठा आरक्षणाचा लढा सुरूच राहणार
जळगाव : मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोरोनासारख्या महामारीत जरी रस्त्यावर मराठा समाज दिसत नसला तरी यामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला असून अ. भा. छावा संघटना बंड उभारून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. मराठा समाजाला दिलेली विविध आश्वासने सरकार विसरल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मृत्यूदरात वाढ
जळगाव: कोरोनामुळे जिल्ह्याच्या मृत्यूदरात दोन अंशानी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्याचा मृत्यूदर हा १.७८ टक्के नोंदविण्यात आला होता. तो शुक्रवारी १.८० टक्कयांवर आला होता. नियमीत होणाऱ्या मृत्यूमध्ये मात्र घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. मृत्यूची संख्या १६ वर आली आहे.
ऑनलाईन बैठक नको
जळगाव : जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा ही येत्या ११ रोजी होणार आहे. मात्र, ऑनलाईन सभेत प्रश्न मांडता येत नाहीत, गोंधळ उडतो, त्यामुळे ऑनलाईन सभा नसावी, असा सूर काही सदस्यांमधून समोर येत आहेत. सभा आॅफलाईन असल्यानंतरच प्रश्न मांडता येतात, सर्वांना बोलायची संधी मिळते, असेही काही सदस्यांचे म्हणणे आहे.