चाळीसगाव शहरात राहणार सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:45 PM2017-08-28T13:45:14+5:302017-08-28T13:49:22+5:30

‘तिसरा डोळा’ : विविध भागातील 10 पॉईंटवर 40 कॅमे:यांना मंजुरी

CCTV sighting in Chalisgaon city | चाळीसगाव शहरात राहणार सीसीटीव्हीची नजर

चाळीसगाव शहरात राहणार सीसीटीव्हीची नजर

Next
ठळक मुद्देशहर पोलिसांनी केली होती मागणी जिल्हा नियोजन समितीने दिली मान्यता

चाळीसगाव, दि. 28-  शहरातील प्रमुख चौकात व रस्त्यांवर 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्व मुख्य पॉईंटवर या कॅमे:यांची नजर राहणार आहे. 
शहरातील  सुरक्षेच्या दृष्टीने अनेक दिवसांपासून सीसीटीव्ही कॅमेरे मिळावेत अशी मागणी होती. पोलिसांची ही मागणी  आता पूर्ण झाल्याचे  पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी सांगितले.
शहरातील 23 पॉईंटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पोलिसांनी सव्रे करुन नियोजन समितीकडे केली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने शहरासाठी त्यापैकी 10 पॉईंटवर  कॅमे:यांना जिल्हा नियोजन समिती बैठकीत नुकतीच मंजुरी मिळाली. कॅमेरे बसविण्याबाबत दोन महिन्यापूर्वी पोलीस अधिका:यांनी शहरात सव्रे केला होता. सीसीटीव्ही कॅमे:यामुळे शहरातील गुन्हेगारांवर आळा बसणार आहे. 
शिवाय रस्त्यांवर होणारी गर्दी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार असल्याने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गाडे पाटील यांनी सांगितले.
या ठिकाणी राहणार ‘नजर’ 
मंजुरी मिळाल्यानुसार शहरातील पुढील विविध भागात पुढीलप्रमाणे कॅमेरे राहणार आहेत. मनमाड चौफुली- 4, वाय पॉईंट धुळे रोड 2, कॅप्टन कॉर्नर 2, देवरे हॉस्पिटल चौक 4, अभिनव शाळेजवळ 2, खरजई नाका परिसर 3, रांजणगाव दरवाजा 3, सदानंद हॉटेल चौक 2, स्टेशन पोलीस चौक 3, हिरापूर नवीन नाक्याजवळ 2 असे 10 पॉईंटवर सीसीटीव्ही कॅमेरे  लवकरच बसविण्यात येणार आहे. 

Web Title: CCTV sighting in Chalisgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.