चोपडा येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 08:39 PM2019-08-03T20:39:01+5:302019-08-03T20:39:23+5:30
चोपडा : देशभरात २६ जुलै हा दिवस ‘कारगील विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्यभावना ...
चोपडा : देशभरात २६ जुलै हा दिवस ‘कारगील विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्यभावना आणि अभिमान वृद्धिंगत होण्यासाठी चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाने एक अनोखा उपक्रम विद्यालयाच्या विश्वस्थ मंगला जोशी व मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या संकल्पनेतून साकारला. विद्यालयातील इयत्ता नववी ब मधील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी जवळच असलेल्या कारगिल चौकात जाऊन चौकाची संपूर्ण साफसफाई केली. चौक पुष्पहार, विविध रंगीत फुले, रांगोळीने सुशोभित केला. मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या हस्ते मेणबत्ती पेटवीत कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. या उपक्रमासाठी शिक्षक पवन लाठी, सरला शिंदे, राकेश विसपुते, हेमराज पाटील, प्रकाश जाधव यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड.रवींद्र जैन यांनी या उपक्रमाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.