तामसवाडी येथे पर्यावरण दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:23+5:302021-06-09T04:20:23+5:30
पिलखोड, ता. चाळीसगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगावअंतर्गत उपकेंद्र, पिलखोड गाव (तामसवाडी) येथे पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला. ...
पिलखोड, ता. चाळीसगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगावअंतर्गत उपकेंद्र, पिलखोड गाव (तामसवाडी) येथे पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष सांगळे, आरोग्य पर्यवेक्षक लुकमान तडवी, आरोग्य सहायक संजय निकुंभ, सुरेंद्र शितोळे, तसेच सायगाव येथील आरोग्यसेवक विकास सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली तामसवाडी येथे डेंग्यू, मलेरिया, हिवताप, तसेच कोरोना जनजागृती करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून तामसवाडी गावात झाडे लावण्यात आली.
हा कार्यक्रम पिलखोड येथील आरोग्यसेवक हेमंत पवार व आरोग्यसेविका सारिका हलदे, तामसवाडी येथील आशा स्वयंसेविका मनिषा परमेश्वर शिंदे व गटप्रवर्तक राजश्री पाटील यांच्या सौजन्याने साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच शिवदास धोंडू पाटील यांच्या हस्ते झाड लावण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच, पोलीस पाटील किरण दळवी यांचे सहकार्य लाभले.