जळगावात झाडाला मैत्रीचा धागा बांधून 'फ्रेंडशिप डे' साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:26 IST2018-08-05T18:22:28+5:302018-08-05T18:26:39+5:30
शहरातील खोटेनगरातील साई मोरया गु्रपतर्फे वृक्षारोपण करून वाढविण्यात आलेल्या झाडांना रविवारी मैत्रीचे धागे बांधत 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यात आला़

जळगावात झाडाला मैत्रीचा धागा बांधून 'फ्रेंडशिप डे' साजरा
ठळक मुद्देसाई मोरया ग्रुपचा उपक्रमवृक्षारोपण करून वाढविलेल्या झाडांना बांधले मैत्रीचे धागेतरुणांनी घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ
जळगाव- शहरातील खोटेनगरातील साई मोरया गु्रपतर्फे वृक्षारोपण करून वाढविण्यात आलेल्या झाडांना रविवारी मैत्रीचे धागे बांधत 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यात आला़
यावेळी वृक्ष संवर्धनाची शपथ देखील घेण्यात आली़ यावेळी ग्रुपचे अध्यक्ष उमाकांत जाधव, धीरज पाटील, अजय खरात, हर्षल चौधरी, निखील पाटील, प्रशांत पाटील, धीरज महाजन व पराग गुजर आदी सदस्य उपस्थित होते़
दरम्यान, जळगाव शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रविवारची सुटी असताना देखील मैत्रीदिन उत्साहात साजरा केला. फेसबुक, व्हॉटस् अॅप यासह सोशल मिडीयावर मैत्रीदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत होता.