जीएमसीत परिचारिका दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:42+5:302021-05-13T04:16:42+5:30

जळगाव : परिचारिका सेवेला अत्याधुनिक स्वरूपात आणणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त ...

Celebrate Hostess Day with GM | जीएमसीत परिचारिका दिन साजरा

जीएमसीत परिचारिका दिन साजरा

Next

जळगाव : परिचारिका सेवेला अत्याधुनिक स्वरूपात आणणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना प्रतिबंधत्वाचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर, फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या प्रतिमेला अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी माल्यार्पण केले.

यानंतर अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी मनोगत व्यक्त करीत रुग्णालयात सेवा देत असलेल्या परिचारिकांना सदिच्छा देत, निःस्वार्थपणे सेवा देत असल्याने रुग्णांच्या मनात आदराचे स्थान निर्माण होत असल्याचे सांगितले. विद्यार्थिनी परिचारिका दिव्या सोनवणे, किरण साळुंखे यांचा ऑक्सिजन नर्स म्हणून सेवा बजावत असल्याने अधिष्ठाता डॉ.रामानंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अधिसेविका कविता नेरकर, प्राचार्य अनिता भालेराव, सविता कुरकुरे, कविता पवार, राजश्री आडाळे, माने, त्रिमाळी, युगंधरा जोशी, रोजमेरी वळवी, छाया पाटील यांचाहि विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.संगीता गावीत, अधिपरिचारिका जयश्री जोगी, योगिता पवार, नीला जोशी, अर्चना धिमते, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Celebrate Hostess Day with GM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.