स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:22 AM2021-08-17T04:22:15+5:302021-08-17T04:22:15+5:30
महावितरणच्या जळगाव परिमंडळ कार्यालयात अधीक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर गुणवंत कामगारांचा सत्कार झाले. सुत्रसंचालन उप ...
महावितरणच्या जळगाव परिमंडळ कार्यालयात अधीक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर गुणवंत कामगारांचा सत्कार झाले. सुत्रसंचालन उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालय
दि. पूर्व खान्देश शिक्षण संस्था संचलित सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात शालेय समितीचे प्रमुख सुरेश लोढा यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका आशा साळुंखे व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
इकरा शाहीन विद्यालय
इकरा शाहीन विद्यालयात उद्योजक शेख मो. जफर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राथमिकचे मुख्याध्यापक काझी अख्तरोद्धीन, हाजी गुलाम नवी, आयटीआयचे प्राचार्य झुबैर मलिक, इकरा हायस्कुलचे प्राचार्य शेख गुलाब यांच्यासह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
श्रीराम विद्यालय
श्रीराम तरूण मंडळ संचलित श्रीराम माध्यामिक विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष बाळा सानप यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक गजानन लाडवंजारी, सचिव अशोक लाडवंजारी, सदस्य देवीदास आंधळे, डॉ.तुषार मोरे, प्रकाश बडगुजर, शुभम लाडवंजारी, सुरेश लाड, वासुदेव सानप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महिला विद्यालय
अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व महिला महाविद्यालयात प्राचार्या डॉ.जयश्री नेमाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील विविध विभागाचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
महाराणा प्रताप विद्यालय
प्रेमनगर येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शालेय समिती सदस्य विवेक बंगाली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका साधना शर्मा, उपमुख्याध्यापक डी. एस. पाटील, पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे, गजेंद्र पाटील उपस्थित होते.
महात्मा गांधी विद्यालय
भादली येथील महात्मा गांधी विद्यालयात अरूण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन गोविंद महाजन, मधुकर नारखेडे, राजेंद्र कोल्हे, मुख्याध्यापक डी. के. धनगर, वैभव चौधरी, राजश्री सोनवणे, आश्विनी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अलफैज उर्दु हायस्कुल
शिवाजी नगर येथील अलफैज उर्दु हायस्कुल मध्ये संस्थेचे चेअरमन मुश्ताक सालार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक पठाण आसिफ खान, वकार अहमद उपस्थित होते. यशस्वीतेसाठी असिम पिंजारी, शेख तौफिक, शेख नवाब, आयशा खान, शाहीन कुरैशी, जाहीद खान, अवैस खान आदींनी परिश्रम घेतले.
समता जागृती संस्था
समता जागृती बहुउद्देशिय संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष यशवंत घोडेस्वार व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष जे. डी. भालेराव यांच्याहस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दीपक तायडे, सिद्धार्थ तायडे, विकास तायडे, गौतम सपकाळे उपस्थित होते.