रावेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 08:51 PM2020-08-15T20:51:48+5:302020-08-15T20:54:13+5:30

रावेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

Celebrate Independence Day at Raver | रावेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

रावेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

Next


रावेर : तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळा शनिवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. प्रारंभी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक व फौजदार मनोज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र पोलीस दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, न.पा. मुख्याधिकारी रवींद्र लांडे, जि. प. बांधकाम उपविभागीय अभियंता चंद्रकात चोपडेकर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.डी. महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, नायब तहसीलदार कविता देशमुख, सी.जे पवार, एन.जे. खारे, तालुका पशु सर्व लघुचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ.रणजित पाटील आदी उपस्थित होते.
ध्वजारोहण सोहळ्यानंतर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पाल येथील स्वातंत्र्य सैनिक बाबूराव फालक यांचे गुलाबपुष देवून स्वागत केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील उर्वरित ४३ स्वातंत्र्य सैनिकांचा त्या त्या गावातील तलाठी कार्यालयात झुम अ‍ॅपद्वारे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सुसंवाद साधून संबंधित तलाठींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, कोरोनाच्या साथरोग नियंत्रणात तन- मन -धनाने योगदान देणाऱ्या सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, दाते, कोरोना योद्धे असलेले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल व पोलीस कर्मचारी, पं.स.कर्मचारी, न.पा.सफाई कर्मचारी, पोलीस पाटील, तलाठी, कोविड केअर सेंटरवर सेवा बजावणारे अभियंता, आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर नाकाबंदीत सेवा बजावणारे शिक्षक व कर्मचारी तथा पत्रकारांना फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी प्रदान केलेले प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी,निंभोरा फळबागायतदार युनियनचे अध्यक्ष कडू चौधरी, शिवसेनेचे तालुका संघटक अशोक शिंदे, दिलीप कांबळे, भाजपचे तालुका सरचिटणीस सी. एस.पाटील, रा.काँ.शहराध्यक्ष मेहमूद शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, वंचित बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळू शिरतूरे, गयासोद्दीन काझी, धुमा तायडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Celebrate Independence Day at Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.