लष्करातील जवानांचा सन्मान करून पाकिस्तानवर भारताचा विजय दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:25 PM2020-12-17T16:25:39+5:302020-12-17T16:27:12+5:30
सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत ‘शौर्य तुला वंदितो’ या शीर्षकाखाली साजरा करून लष्करातील पाच जवानांना सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : भारत पाकिस्तानच्या झालेल्या युद्धात १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवल्याने हा दिवस भारताचा विजय दिन म्हणून लष्करात साजरा केला जातो. सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी हा दिवस ‘शौर्य तुला वंदितो’ या शीर्षकाखाली साजरा करून लष्करातील जवानांना सन्मानित करण्यात येते. याचाच भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्यावतीने लष्करातील पाच जवानाचा सन्मान करण्यात आला.
यात नितीन महाले (हिमाचल आर्मी ऑन ड्यूटी), भैय्यासाहेब देसले (आग्रा आर्मी), प्रवीण पाटील (अरुणाचल प्रदेश आर्मी), मनोज परदेशी (मेरठ दिल्ली आर्मी), शैलेश महाले (काश्मीर त्रिपुरा आर्मी), यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी स्वरुपात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप घोरपडे यांनी करून कार्यक्रमा मागचा हेतू विशद केला. यावेळी प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम चव्हाण, जिल्हा प्रशासन गजानन मोरे, रवींद्र सूर्यवंशी, अजय जोशी, दिगंबर शिर्के, विवेक रणदिवे, विनोद शिंपी, योगेश शेळके, दीपक राजपूत, जितेंद्र वाघ, दिनेश घोरपडे, रवींद्र दुशिंग, सचिन पाटील, मनोज भोळे, अरुण आजबे, गणेश पाटील, हर्षवर्धन साळुंखे , प्रतीक पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी केले.