एसएसबीटी महाविद्यालयात फार्मासिस्ट दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 06:38 PM2020-09-26T18:38:53+5:302020-09-26T18:39:05+5:30
जळगाव : एसएसबीटी फार्मसी महाविद्यालयामध्ये २५ सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयात ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन या वर्षीच्या ...
जळगाव : एसएसबीटी फार्मसी महाविद्यालयामध्ये २५ सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला.
महाविद्यालयात ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन या वर्षीच्या फार्मासिस्ट दिनाचा केंद्र विषय होता. या कार्यक्रमात अयाज मोहसीन, संतोष भुजबळ, डॉ. एम. एफ. हुसेन, प्राचार्य डॉ. अमोल लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात ही दीपप्रज्वलनाने झाली. नंतर अयाज मोहसीन यांनी मार्गदर्शन केले, त्यात त्यांनी महामारीच्या काळात फार्मासिस्टने समाजाला एक सेवा पुरवली आहे. आपण नेहमीच मोठे स्वप्न पाहायला पाहिजे. औषध संशोधनापासून ते एका रुग्णाच्या हातात येईपर्यंत फार्मासिस्टची महत्वाची भूमिका असते, असे त्यांनी सांगितले. तसेच प्राचार्य डॉ. अमोल लांडगे यांनी प्रस्तावना सादर करताना सांगितले कि, महाविद्यालय विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना देत असल्याचे सांगितले. त्यानंतर फार्मासिस्ट दिनानिमित्त ऑनलाईन पेपर प्रेझेन्टेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.