योग दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:55+5:302021-06-23T04:11:55+5:30
के.सी.ई अभियांत्रिकी महाविद्यालय खान्देश कॉलेज एज्युकेशन संचलित अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विभाग आणि सोहम नॅचरोपॅथी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...
के.सी.ई अभियांत्रिकी महाविद्यालय
खान्देश कॉलेज एज्युकेशन संचलित अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विभाग आणि सोहम नॅचरोपॅथी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के.पी.राणे होते. यावेळी डॉ. संजय सुगंधी, डॉ. प्रज्ञा विखार, क्रीडा संचालक नितीन चौधरी उपस्थित होते. योग प्रशिक्षक प्रा.डॉ. ज्योती वाघ यांनी विविध प्रकारचे योग करून दाखवले. तसेच प्रा.राजेश वाघुळदे, डॉ. सदानंद सोनार, प्रा. पंकज खासगाबे यांचे सहकार्य लाभले.
खुबचंद सागरमल विद्यालय
खुबचंद सागरमल विद्यालयात शिक्षकांनी विविध आसने सादर केली. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख विजय पवार, मुख्याध्यापक सतीश साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश आदीवाल, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, उपस्थित होते.
बहिणाबाई विद्यालय
बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात क्रीडा शिक्षक डॉ. विलास नारखेडे, संतोष पाटील, विशाल पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन योग सादर केला. यासाठी मुख्याध्यापक टी.एस. चौधरी, प्रतिभा खडके, राम महाजन, शंकर चव्हाण, चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभले.
स्वामी विवेकानंद महाविद्यालय
स्वामी विवेकानंद महाविद्यालयात डॉ. रणजीत पाटील आणि सचिन महाजन यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रात्याक्षिके सादर केली. यासाठी प्राचार्य स.ना भारंबे, उपप्राचार्य के.जी. सपकाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
लायनेस क्लब
योग दिवसाचे औचित्य साधून लायनेस क्लबतर्फे एक दिवसीय योगा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी मंचावर लायन अध्यक्ष पन्नालाल वर्मा, सचिव रोहित अग्रवाल, कोषाध्यक्ष राम नारायण वर्मा, लायनेस अध्यक्षा प्रीती जैन, सचिव अलका कांकरीया, योग शिक्षिका प्रिया दाराए गिरीश सिसोदिया, कोमल मीना, राणी नाथानी उपस्थित होते. नारायण भारवाणी, दिलीप चौबे, अनिता कांकरीया, विजया बाफना यांचे सहकार्य लाभले