पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:28 PM2019-06-17T13:28:37+5:302019-06-17T13:29:47+5:30

धार्मिक : मंदिरात पूजेसाठी महिलांची गर्दी

Celebrating Environmental Supplemental Pump | पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी

पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी

Next

जळगाव : पती-पत्नीचे नाते जन्मोजन्मी अखंड रहावे अन् जन्मोजन्मी हाच पती मिळू दे.. अशी प्रार्थना करत शहरात विविध ठिकाणी रविवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. काही ठिकाणी सामाजिक संस्थातर्फे वटपोर्णिमेनिमित्त महिलांना वटवृक्षाच्या रोपट्यांचे वितरण आणि रोपणही करण्यात आले.
पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री यांच्या आयुष्यात आलेल्या एका प्रसंगाभोवती हा पौर्णिमेचा दिवस गुंफला गेला. त्यानुसार वटपोर्णिमानिमित्त शहरातील विविध मंदिरांमधील व चौकांमधील वडाच्या झाडाखाली सकाळपासूनच महिलांची गर्दी दिसून आली. पारंपारिक पद्धतीने महिलांनी वडाच्या झाडाला धाग्याचे सात फेरे बांधत तिथे उपस्थित महिलांनी आब्यांचे वाण दिले. नविन बस स्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरात असणाऱ्या वडाच्या झाडाखाली महिलांनी मोठ्या संख्येने पूजेसाठी गर्दी केली होती. दादा महाराज जोशी यांनी यावेळी उपस्थित महिलांना वटसावित्रीची पूजा व महत्व सांगितले. तसेच अयोध्या नगरातील हनुमान मंदिरातील वडाच्या झाडाखाली महिलांनी सकाळपासूनच पुजेसाठी गर्दी केली होती. तर गणेश कॉलनी, जुने जळगाव, शिव कॉलनी, नवीपेठ, रिंग रोड, महाबळ, अयोध्यानगर व इतर परिसरात असणाºया वडांच्या झाडांखाली दिवसभर पूजेसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.
स्वामी समर्थ केंद्रातर्फे जलपुर्नभरण
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे वट सावित्री पोर्णिमेनिमित्त, स्वामी समर्थ केंद्राच्या छतावरील पाणी जमिनीत मुरविण्यासाठी केंद्राच्या परिसरात जल पुर्नभरण करण्यात आले. यावेळी वट पौर्णिमानिमित्त महिलांनी वडाचे पूजन केले. यावेळी विजय साळुंखे , संगीता महाजन, जयश्री पाटील , साधना पाटील, मनीषा पाटील, अर्चना पाटील, श्री स्वामी समथर् केंद्राचे पर्यावरण प्रतिनिधी वसंत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर प्रतिनिधी योगेश इंगळे, युवा प्रतिष्ठानचे विलास कुमावत, व बिबा नगर केंद्राचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नीर फाऊंडेशनतर्फे वटवृक्षाचे
रोप वाटप

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नीर फाऊंडेशनच्या वतीने वटपोर्णिमेनिमित्त ओकारेश्वर मंदिर येथे महिलांना वटवृक्षाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन, निलेश जोशी, रोहित सोनवणे, शेखर वाघ, श्रीहरी सोनार, भैरवी जैन, देवेंद्र महाजन, आयुषी कामदार, निलेश निंबाळकर, स्नेहा पाटील , सचिन खैरनार उपस्थित होते.

Web Title: Celebrating Environmental Supplemental Pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.