बालाजी संस्थानकडून ब्रह्मोत्सवाची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:18 AM2017-09-18T00:18:14+5:302017-09-18T00:19:52+5:30
श्री बालाजी संस्थानकडून साजºया होणाºया ब्रह्मोत्सवाची तयारी सुरूझाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : श्री बालाजी संस्थानकडून साजºया होणाºया ब्रह्मोत्सवाची तयारी सुरूझाली आहे. २१ सप्टेंबरपासून या महोत्सवास प्रारंभ होईल.
या वहनोत्सव मिरवणुकीसाठीची बाहुल्यांची सफाई, किरकोळ दुरुस्ती तथा रंगरंगोटीचे काम कारागीर व संस्थानच्या कर्मचाºयांकडून सुरू आहे. या वहन रथोत्सव मिरवणुकीच्या वेळी श्री बालाजी महाराजांना गावातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवले जाते.
दररोज वेगवेगळी वाहने निघतात. या वाहनांवर वेगवेगळे बाहुले ठेवले जातात. संस्थानच्या मालकीचे लाकडी, आकर्षक असे आठ फुटांपर्यंत एकूण १६५ बाहुले आहेत. त्यात इंद्र, अंगद, अर्जुन, हनुमान, हत्ती, घोडे, हरीण, मोर आदी आहेत़
पºया, राक्षस, वानर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे उभे बाहुले आहेत.
या सर्व बाहुल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. ज्या चारचाकी वाहनातून श्रींची मिरवणूक काढण्यात येते त्या चार चाकीचीही दुरुस्ती आॅईल तेलपाणी देण्याचे काम सुरू आहे. शहरासह तालुक्यात या ब्रह्मोत्सवाचे बॅनर पोस्टर लावण्याचे काम स्वयंसेवकांकडून सुरू आहे. या बाहुल्यांच्या सजावटीसाठी रमेश शिंपी, शालीक लोहार, गोपाल महाजन, बुधा बारी, वसंत बारी, राजू बारी, संजय बारी यांच्यासह हमाल मोगरीवाले बांधव काम करीत आहे.
आज मंडप स्तंभारोपण
श्री बालाजी संस्थानकडून साजºया होणाºया ब्रह्मोत्सवाची सुरुवात मंडप स्तंभारोपणाने होते. १८ रोजी सकाळी ६.२५ वाजता मंदिराच्या प्रांगणात मंडप स्तंभारोपण संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांच्या हस्ते होणार आहे. उपस्थितीचे आवाहन संस्थानतर्फे रावसाहेब भोसले यांनी केले़