कर्नाटक विजयाचा जळगावात फुगडी खेळून जल्लोष

By सुनील पाटील | Published: May 13, 2023 10:52 PM2023-05-13T22:52:45+5:302023-05-13T22:53:30+5:30

शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा

Celebration of Karnataka victory by playing balloons in Jalgaon | कर्नाटक विजयाचा जळगावात फुगडी खेळून जल्लोष

कर्नाटक विजयाचा जळगावात फुगडी खेळून जल्लोष

googlenewsNext

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: कर्नाटक राज्यात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविल्याने जळगावात काँग्रेस पक्षाने शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, महानगर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांनी काॅग्रेस भवनासमोर महिला कार्यकर्त्यांसोबत फुगडी खेळली. यावेळी मिठाई वाटप करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Celebration of Karnataka victory by playing balloons in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.