जळगाव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला 'कर्नाटक'च्या विजयाचा आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:56 PM2018-05-15T12:56:48+5:302018-05-15T12:56:48+5:30
एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून जल्लोष
आॅनलाइन लोकमत
जळगाव / चाळीसगाव, दि. १५ - कर्नाटक विधानसभेच्या निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने जळगाव शहरासह चाळीसगाव येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कर्नाटक विधानसभेचे निकाल मंगळवारी जाहीर झाल्याने प्रारंभीपासूनच भाजपा उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतल्याने दुपारी बारा वाजता भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसताच भाजपा कार्यकर्ते एकत्र आले. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून हा विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. जळगाव येथे भाजपा कार्यालयाजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
चाळीसगाव येथे मुख्य टपाल कार्यालयासमोर एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ज्येष्ठ नेते वाडीलाल राठोड, भाजपाचे पालिकेतील गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक सुरेश स्वार, बाजार समितीचे सभापती रवींद्र चुडामण पाटील, शेषराव पाटील, प्रेमचंद खिंवसरा, माजी जि. प. सदस्य राजेंद्र राठोड, नगरसेवक चंद्रकांत तायडे, नाना पवार, जितेंद्र वाघ, राकेश नेवे, राजेंद्र मांडे, दिलीप गवळी, सचिन स्वार आदी जल्लोषात सहभागी झाले होते. कर्नाटक मधील विजय हा केंद्र सरकारच्या यशस्वी वाटचालीचे प्रतिक आहे. केंद्र सरकार आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजनांचे फलित आहे. असे मत यावेळी सुरेश स्वार व राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले.