जळगावात रेल्वे रुळावर ठेवले सिमेंटचे ब्लॉक, गोदान एक्स्प्रेसचा अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:46 PM2018-05-14T12:46:38+5:302018-05-14T12:46:38+5:30

घातपाताचा प्रयत्न

Cement block, Gonadan Express collapses in Jalgaon on Rail track | जळगावात रेल्वे रुळावर ठेवले सिमेंटचे ब्लॉक, गोदान एक्स्प्रेसचा अपघात टळला

जळगावात रेल्वे रुळावर ठेवले सिमेंटचे ब्लॉक, गोदान एक्स्प्रेसचा अपघात टळला

Next
ठळक मुद्देकोल्हे हिल्स परिसरातील घटनाइंजिन बदलले, ४० मिनिटे खोळंबा

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ - मुंबई येथून बिहारकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसचा घातपात घडविण्याचा प्रयत्न रविवारी सायंकाळी उघड झाल्याने खळबळ उडाली. कोल्हे हिल्स परिसरात रेल्वे रुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवण्यात आला होता. भरधाव वेगाने आलेल्या या गाडीच्या धडकेत ब्लॉकचे तुकडे झाले तर इंजिनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालकाचे प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला.
दुसरे इंजिन मागविले
या घटनेमुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने जळगाव स्थानकावरुन दुसरे इंजिन मागविले व गाडी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. दरम्यान, या घटनेप्रकरणी रेल्वेच्या अधिकाºयांनी तालुका पोलीस स्टेशन गाठून अज्ञात व्यक्तीविरुध्द तक्रार दिली. घातपात किंवा अपघात घडविण्याच्या दृष्टीने रेल्वे रुळावर दगड ठेवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरक्षित बोगीतून धूर निघाल्याने सचखंड एक्सप्रेसचा खोळंबा
रेल्वे रुळावर सिमेंटचे ब्लॉक ठेवल्याच्या घटनेच्या आधी अमृतसर-नांदेड या सचखंड एक्सप्रेसच्या (क्र.१२७१६) एस-५ या आरक्षित बोगीत अचानक धूर निघाल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. रविवारी दुपारी साडे चार वाजता गाळण स्थानकाजवळ हा प्रकार घडला. यावेळी प्रवाशांनीच साखळी ओढून गाडी थांबविली. या घटनेमुळे सचखंड एक्सप्रेस गाळण स्थानकाजवळ तब्बल ३५ मिनिटे थांबून होती.
चालकाचे प्रसंगावधान
मुंबई येथून बिहारमधील छपरा येथे जाणारी गोदान एक्सप्रेस (क्र.११०५५) भुसावळच्या दिशेने जात असताना जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाºया कोल्हे हिल्स परिसरात खांब क्र.४१३ /२३ ते २५ या दरम्यान रेल्वे रुळावर कोणीतरी सिमेंटचे रेल्वेचेच दोन फुटाचे ब्लॉक ठेवले होते.
गाडी भरधाव वेगाने असल्याने हा प्रकार चालकाच्या निदर्शनास उशिरा आला. त्यामुळे या ब्लॉकचे तुकडे झाले व त्याचा फटका इंजिनला बसला. त्याचा मोठा आवाज झाल्याने चालकाने नियंत्रण मिळवित गाडी थांबविली. चालकाने ही घटना लागलीच स्टेशन मास्तरला कळविली. त्यानंतर सरकारी यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली.
रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक महेंद्र पाल, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक रत्नपारखी, जितेंद्र पाटील, वासुदेव मराठे, पोपट सोनार यांच्यासह लोहमार्ग पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरु होता.
इंजिन बदलले, ४० मिनिटे खोळंबा
घातपात किंवा अपघात होण्याच्या दृष्टीनेच हे ब्लॉक रुळावर ठेवण्यात आल्याचा संशय आहे. भरधाव वेगाच्या गाड्या अशा अपघातात रुळाच्याखाली घसरण्याचा धोका असतो. या घटनेत चालकाने नियंत्रण मिळविल्याने गाडी रुळाच्याखाली गेली नाही, परंतु इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी तब्बल ४० मिनिटे ही गाडी घटनास्थळावर थांबून होती.

 

Web Title: Cement block, Gonadan Express collapses in Jalgaon on Rail track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.