क्रेनच्या साहाय्याने टाकले सिमेंट पाइप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:52+5:302021-05-03T04:11:52+5:30
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला चांगलाच वेग आला असून यामध्ये नाल्याचे पाणी वाहून जाण्यासाठी रविवारी क्रेनच्या ...
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला चांगलाच वेग आला असून यामध्ये नाल्याचे पाणी वाहून जाण्यासाठी रविवारी क्रेनच्या साहाय्याने पाइप टाकण्यात आले. त्यावर स्लॅब टाकण्यात येणार आहे व त्यानंतर चौपदरीकरणाचे काम त्यावर होणार आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील रहदारी कमी झाली असून कामाचा वेगदेखील वाढला आहे. यात रविवारी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या समोर सिमेंट पाइप टाकण्यात आले. या ठिकाणी नाला असून पावसाळ्यात त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी या नाल्याच्या पाण्यासाठी सिमेंटचे पाइप टाकण्यात आले असून त्यावर स्लॅब टाकून महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.
महिनाभरात महामार्गाला जोडणारे सुमारे २० लहान जंक्शन पूर्ण करण्यात आले. कालिंकामाता मंदिर आणि इच्छादेवी मंदिर येथे पाइप कल्व्हर्टचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच सालारनगरातील पूल आणि विद्युत कॉलनीतील लहान पूल यांचे कामदेखील वेगात सुरू आहे.