दीपनगरातील स्मशानभूमीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 05:10 PM2019-05-19T17:10:51+5:302019-05-19T17:12:06+5:30

दीपनगर परिसरातील तापी नदीच्या काठी व जुने रेस्ट हाऊसशेजारी असलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.

Cemetery of Deepangan | दीपनगरातील स्मशानभूमीची दुरवस्था

दीपनगरातील स्मशानभूमीची दुरवस्था

Next
ठळक मुद्देदीपनगर प्रशासनासह निंभोरा व फेकरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्षउन्हाळ्यात व पावसाळ्यात होतात हाल

दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : दीपनगर परिसरातील तापी नदीच्या काठी व जुने रेस्ट हाऊसशेजारी असलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.
 दीपनगर परिसरातील तापी नदीकाठी व जुने रेस्ट हाऊसशेजारी स्मशानभूमी आहे. निंभोरा, फेकरी, दीपनगर या गावांची लोकसंख्या २० हजारावर आहे. या तिन्ही गावांची एकच स्मशानभूमी एकच आहे. मात्र ही स्मशानभूमी विविध समस्यांच्या गर्तेत आहे. परिसरात स्वच्छता नसते. स्मशानभूमीत सरण रचण्यासाठी उभारलेले कठडे नसल्याने उघड्यावर रचावे लागते. हे लोखंडी कठडे वर्षा-दोन वर्षात बदलले गेले पाहिजे. मात्र आजपर्यंत लोखंडी कठडे सहा ते सात वर्षांपासून बदललेले नाही. एक वेळा बांधून झालेल्या स्मशानभूमीची दुरवस्था होते. तरीदेखील दुरुस्ती केली जात नाही. या दोन्ही गावातील नागरिकांनीही बऱ्याच वेळा व्यथा मांडलेल्या आहेत. मात्र यांना स्मशानभूमीची व्यवस्था कोणी ठेवावी, त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची आहे याबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसल्याने या समस्यांचा जबाब कोणाला विचारावा, असा प्रश्न पडतो. त्यासाठी ग्रामपातळीवर जनजागृती होणे गरजेचे आहे. ग्राम प्रशासनानेही याकडे लक्ष घालून ग्रामसंस्थेसह स्थानिक समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
फेकरी-निंभोरा दोन्ही गावांमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे त्यांना देखील दीपनगरातील स्मशानभूमीमध्ये प्रेत आणावे लागते. त्यात दीपनगरातील स्मशानभूमीत सोयी-सुविधांचा मोठा अभाव जाणवतो. एवढेच नाही तर अंत्यसंस्काराच्यावेळी येणाऱ्यांना नागरिकांना येथे बसण्यासाठी जागा तसेच रात्री प्रेत आणल्यास विजेची व्यवस्था नाही.
रात्रीच्या वेळेस एखादी प्रेत आणले तर विधी करताना रात्रीच्या वेळेस विजेची सुविधा नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मोबाइलच्या टॉर्चद्वारे अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपला जातो. जीर्ण स्मशानभूमी पडण्याचा धोका आहे. एखाद्या अंत्ययात्रेच्या दिवशी पडल्यास मोठा अनर्थ तेथे घडू शकतो. तरीदेखील या स्मशानभूमीकडे अद्यापही दीपनगर प्रशासनाने व ग्रामपंचायतीने दखल घेतलेली नाही.
मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढते. त्यावेळी अंत्यविधीसाठी आलेल्यांना अंत्यविधी होईपर्यंत उन्हातच रस्त्यावरच उभे राहावे लागते.
दीपनगर प्रशासनाने स्मशानभूमी परिसरात वृक्षदेखील लागवड केली होती. मात्र या परिसरात एकदेखील वृक्ष जगलेला नाही. स्मशानभूमी परिसरात मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली आहे. तसेच राख, कोळसा, लाकडे, कपडे आदी साहित्य तेथेच पडलेले असते. ग्रामपंचायतीने व दीपनगर प्रशासनाने हा परिसर स्वच्छ केला आणि प्रशासनास सुशोभिकरण्याचा प्रस्ताव पाठवल्यास स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध होऊ शकतात. मात्र या परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधींचेदेखील साफ दुर्लक्ष झाले आहे.
दीपनगर प्रशासनाने स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी दोन्ही गावातील नागरिकांकडून होत आहे. यासंदर्भात निंभोरा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी लीलाधर नहाले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे दुरुस्तीचे काम दीपनगर प्रशासनाचे आहे, असे सांगितले. फेकरी ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी मानकरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘मी विचारून सांगतो, दुरुस्तीचे कोणाकडे आहे ते.’

Web Title: Cemetery of Deepangan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.