पीजे रेल्वेकडे केंद्राचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:21 PM2019-02-04T18:21:57+5:302019-02-04T18:24:20+5:30

पाचोरा-जामनेर या नॅरोगेज गाडीचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे यासाठी सर्वेक्षण झाले. नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी काही तरतूद होईल ही या भागातील प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली आहे.

The Center ignored the PJ Railway | पीजे रेल्वेकडे केंद्राचे दुर्लक्ष

पीजे रेल्वेकडे केंद्राचे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देअर्थसंकल्पात तरतूद नसल्याने संभ्रमसर्वेक्षणानंतर प्रवाशांची अपेक्षा ठरली फोल


जामनेर, जि.जळगाव : पाचोरा-जामनेर या नॅरोगेज गाडीचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे यासाठी सर्वेक्षण झाले. नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी काही तरतूद होईल ही या भागातील प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली आहे.
पीजे म्हणून ओळखल्या जात असलेल्या या रेल्वे जामनेरहूनपुढे बोदवडपर्यंत जोडली जावी या मागणीच्या अनुषंगाने गेल्यावर्षी सर्वेक्षण करण्यात आले. यामुळे पाचोरा व जामनेर तालुक्यातील प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या.
पीजे रेल्वे मार्ग जळगाव व रावेर या लोकसभेच्या दोन्ही तालुक्यांना जोडणारा असल्याने दोन्ही खासदारांनी यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. दोन्ही खासदार भाजपचे असून केंद्रात शासनही याच पक्षाचे असल्याने दिरंगाई का, अशी विचारणा प्रवासी करीत आहेत.
नजीकच्या काळात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने हा मुद्दा विरोधकांकडून प्रचारासाठी वापरला जाऊ शकतो. गेल्या काही निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक याविषयी मतदारांना आश्वासन देतात. मात्र ती आश्वासने पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Web Title: The Center ignored the PJ Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.