सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्रीय सफाई आयोगाने जिल्हाधिकाºयांकडून मागविला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 06:10 PM2018-09-04T18:10:30+5:302018-09-04T18:11:25+5:30
बोदवड येथे सफाई कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच
बोदवड, जि.जळगाव : सफाई कर्मचाºयांच्या समस्यांबाबत केंद्रीय सफाई आयोगाने जिल्हाधिकाºयांकडून खुलासा मागविला आहे. दरम्यान, सफाई कर्मचाºयांचे ‘काम बंद’ आंदोलन मंगळवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते.
नगरपंचायतीच्या मुख्याधिकाºयांनी ३१ आॅगस्ट रोजी पहाटे बोदवड शहरात सफाई कर्मचाºयांची अचानक पाहणी केली व हजेरीही घेतली. किती कामावर आहेत, किती गैरहजर आहेत याचा आढावा घेतला. यात त्यांना एकूण ५४ पैकी ११ सफाई कर्मचारी गैरहजर आढळले. यात त्यांचे एका दिवसाचे वेतन कापण्याचा निर्णय मुख्याधिकाºयांनी घेतला.
यानंतर १ सप्टेंबरपासून पगारवाढीच्या मागणीसाठी सफाई कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना ८० रुपये रोज मिळायचा. यानंतर ६ मे २०१६ रोजी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना दिले जाणारे वेतन नगरपंचायतीच्या अस्तित्वानंतरही कायम आहे. नेमका हा मुद्दा हेरून सफाई कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. वेतनात वाढ करावी, अशी कर्मचाºयांची भूमिका आहे.
कर्मचाºयांच्या पगारवाढीसंदर्भात २५ मे २०१८ रोजी जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सफाई कर्मचाºयांच्या समस्येबाबत नगरसेवक दीपक झांबड यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग दिल्लीला पत्र लिहिले होते. या पत्रात सफाई कर्मचाºयांना सुरक्षेसाठी हातमोजे, तोंडाला मास्क तसेच इतर सुविधा मिळत नसल्याचे नमूद केले होते. या पत्रावरून आयोगाच्या उपाध्यक्षा यास्मिन सुलताना यांनी जळगाव जिल्हाधिकाºयांना पत्र लिहून विचारणा केली असून, १५ दिवसात खुलासा मागितला आहे. सदर पत्राची दुय्यम प्रत नगरसेवक दीपक झांबड यांना प्राप्त झाली आहे. त्यात सफाई कर्मचाºयांच्या समस्येबाबत विचारणा करण्यात आली आहे.
दरम्यान, सफाई कर्मचाºयांनी पुकारलेले काम बंद आंदोलन मंगळवारी चौथ्या दिवशीही कायम होते. यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.