जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून केंद्रीय समितीही हळहळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 03:57 PM2018-12-06T15:57:33+5:302018-12-06T16:22:39+5:30

विश्लेषण

 Central committee also saw drought situation | जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून केंद्रीय समितीही हळहळली

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून केंद्रीय समितीही हळहळली

Next

-सुशील देवकर

जळगाव: दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय समितीने दुष्काळी भागात जाऊन पाहणी करताना स्थानिक शेतकºयांशीही मनमोकळा संवाद साधला. दुष्काळी परिस्थिती पाहून समिती सदस्यही हळहळले. दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याबाबत त्यांचे मत दिसून आल्याने मदतीबाबत समिती सदस्य सकारात्मक दिसून आल्याचे समजते.
बुधवारी सायंकाळी औरंगाबादहून जळगाव जिल्ह्यात आगमन करतानाच समितीने जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत या गावाला भेट देऊन दुष्काळाची पाहणी केली. तर गुरूवारी सकाळी पारोळा तालुक्यातील  दगडी गावाकडे रवाना झाली. तेथे कपाशीच्या शेताची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी संवाद साधला. चाºयाअभावी गुरेढोरे विकावी लागल्याचे शेतकºयांनी या समितीला सांगितले. तर अमळनेर तालुक्यातील जुनोने गावाला भेट दिली. तेथे शेतातील तुरीच्या शेंगा फोडून पाहिल्या. त्यावेळी त्यात कीड आढळून आले. समितीच्या सदस्यांनी शेतकºयांना पाणी कुठून आणता? किती दिवस चारा पुरेल? कर्ज कुठून घेतले? आदी बाबत विचारणा केली. अमळनेर तालुक्याची परिस्थिती जिल्ह्यात सर्वात बिकट आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहून समितीचे सदस्यही हेलावले. परिस्थिती गंभीर असल्याबाबतच्या मताशी सहमत असल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्राकडे मदतीसाठी समितीकडून शिफारस होण्याची शक्यता वाढली आहे.  दुष्काळ पाहणीसाठी यापूर्वी राज्यातील दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौरा केला होता. मात्र हा दौरा खूपच धावता व सोयीचा होता. महामार्गालगतच्या गावांमध्येच जाऊन पाहणीची औपचारीकता उरकण्यात आली होती. त्याउलट अनेक जिल्ह्यांची जबाबदारी असलेल्या केंद्रीय समितीनेही धावता दौराच केला. मात्र समितीने जेथे भेट दिली, तेथे आवश्यक त्या मुद्यांची योग्यरितीने चौकशी केली व पाहणी केली. जिल्हा प्रशासनानेही या समितीसाठी योग्यरितीने गावांची निवड केली. गुरूवारी दुपारी ही समिती धुळ्याहून नाशिककडे समिती रवाना झाली. मात्र जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र निश्चितपणे ही समिती केंद्राकडे मांडेल, अशी आशा जनतेला निर्माण झाली आहे.

Web Title:  Central committee also saw drought situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.