केंद्रीय समितीने केली प्रयोगशाळेत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:16 AM2021-04-10T04:16:22+5:302021-04-10T04:16:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पथकाने शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पथकाने शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेत भेट देऊन माहिती जाणून घेतली. समितीने सर्व नोंदी घेऊन हा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
केंद्रीय समितीतीत जोधपूर येथील डॉ. श्रीकांत, भुवनेश्वर येथील डॉ. अनुपमा बेहरे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांची उपस्थिती होती. प्रयोगशाळेत नियमीत किती नमुन्यांचे निदान होते. किट् किती उपलब्ध आहेत. मनुष्यबळ पुरेसे आहे का याबाबत विचारणा केली. समितीने या आधी भुसावळ येथे पाहणी केली होती. त्यानंतर ते थेट प्रयोगशाळेच्या पाहणीसाठी आले. चोपडा, चाळीसगाव अशा हॉटस्पॉटची येत्या दोन दिवसात ते पाहणी करणार आहे. १३ एप्रिलपर्यंत ही समिती जिल्ह्यात आहे. यात ज्या भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्या भागात टप्प्या टप्याने पाहणी करून याचा एकत्रित अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.