भुसावळ येथे महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघाची केंद्रीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 02:44 PM2018-12-24T14:44:26+5:302018-12-24T14:46:20+5:30

महाराष्ट्र  राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक रविवारी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात झाली. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर मोरे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत राज्य अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

Central Meetings of Maharashtra State Workers Welfare Federation, Bhusawal | भुसावळ येथे महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघाची केंद्रीय बैठक

भुसावळ येथे महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघाची केंद्रीय बैठक

Next
ठळक मुद्देराज्यातील रिक्त पदांबाबत बैठकीत विचारविनिमयबैठकीत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत जाणून घेतली मतेराज्य अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय

भुसावळ, जि.जळगाव :  महाराष्ट्र  राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक रविवारी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात झाली. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर मोरे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत राज्य अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
राज्यातील इतर कर्मचाºयांना असलेल्या समस्या लक्षात घेऊन बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने प्रत्येक जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी व कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्याबाबत मते जाणून घेण्यात आली आणि सहा संघाच्या राज्याध्यक्षांनी आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, २०१९ मध्ये होणाºया महासंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यातील कर्मचाºयांच्या रिक्त असलेल्या पदांबाबत, अनुशेष भरण्याबाबत हा कृतीबंध शासन निर्णय करण्याबाबत व अंशकालिन पेन्शन योजना तत्काळ बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी प्रामुख्याने महासंघाचे पदाधिकारी केंद्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, अतिरिक्त महासचिव एन.एच.शेजवळ, उपसचिव रवींद्र वेंदे, केंद्रीय सचिव विजय मेढे, नाशिक विभागीय उपाध्यक्ष मिलिंद मेढे, अकोला जिल्हाध्यक्ष गजानन पानझोड, जिल्हाध्यक्ष महासंघ विजय सोनावणे, प्रशांत मेंढे, जयप्रकाश कांबळे, महेंद्र शेजवळ, भूषण नागरे यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: Central Meetings of Maharashtra State Workers Welfare Federation, Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.