केंद्रीय पथक १३ रोजीपर्यंत जळगावातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:27+5:302021-04-09T04:17:27+5:30
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यात आलेले पथक हे १३ एप्रिलपर्यंत थांबणार आहे. यात पहिल्या दिवशी गुरूवारी त्यांनी जिल्हाधिकारी ...
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यात आलेले पथक हे १३ एप्रिलपर्यंत थांबणार आहे. यात पहिल्या दिवशी गुरूवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेतली. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी काही सूचना देखील केल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
आता पुढील चार दिवस हे पथक निरनिराळ्या तालुक्यात भेटी देऊन तेथील पाहणी करणार आहेत. यात या पथकाने कंटेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करा, तसेच रुग्णांवर वेळीच उपचार होणे आवश्यक असल्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. या पथकात जोधपूर एम्सचे डॉ. श्रीकांत आणि भुवनेश्वर एम्सच्या डॉ अनुपमा बेहरे यांचा समावेश आहे. डॉ. श्रीकांत यांनी कोरोना चाचण्या आणि लसीकरण मोहिमेवर लक्ष देण्याची सूचना केली तर डॉ. बेहरे यांनी गंभीर रुग्णांवर लक्ष ठेवल्यास मृत्यू रोखण्यात मदत होईल असे सांगितले.